घरात असा मुलगा असणं म्हणजे संसाराला कलंक, आचार्य चाणक्य यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. घरातील मुलगा कसा असायला हवा आणि त्याला कोणत्या सवयी असू नयेत... याबद्दल आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.

घरात असा मुलगा असणं म्हणजे संसाराला कलंक, आचार्य चाणक्य यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला
| Updated on: Jun 25, 2026 | 9:14 PM

आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे काही विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या नीतिमूल्यांमधून अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. आजही, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यास अनेक लोकांना रस आहे. चाणक्य यांनी घरातील मुलगा कसा असला पाहिजे याबद्दल देखील सांगितलं आहे. प्रत्येक आई – वडिलांना वाटतं की, आपल्या मुलाने चांगलं शिकलं पाहिजे. उत्तम नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे. पण अनेक ठिकाणी तसं होत नाही. म्हणू आचार्य चाणक्य सांगतात की, घरात असा मुलगा असणं म्हणजे संसाराला कलंक असतं… तर मुलांना कोणत्या सवयी असल्या पाहिजे आणि कोणत्या नाही… याबद्दल चाणक्य यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, जो मुलगा आपल्या आईवडिलांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतो आणि कुटुंबाला किंमत न देणाऱ्या वाईट मित्रांच्या संगतीत राहतो, तो कुटुंबावर एक कलंक ठरतो. असा मुलगा केवळ स्वतःचंच आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर कुटुंबाची प्रतिष्ठाही धुळीस मिळवतो. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच सुधारले पाहिजे. त्यांनी चांगलं वळण लावलं पाहिजे…

एवढंच नाही तर, मुलगा वाईट मार्गाला असेल तर, समाजात अशा कुटुंबाचा आदरही कमी होत जातो. तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल बोलावं लागेल. वाईट मुलाच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागेल. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही समाजात टीकेला सामोरं जावं लागेल. त्यामुळे तुम्ही मुलाच्या वागणुकीवर लक्ष ठेवलं पाहिजं.

काही मुले अशी कामे करतात जी त्यांनी करू नयेत, त्यांच्या कामामुळे कुटुंबियांना देखील त्रास सहन करावा लागतो. अशा मुलांना लहानपणीच योग्य मार्गावर लावलं पाहिजे. नाहीतर, मोठे झाल्यावर ते तुमचं कधीच आणि काहीच ऐकणार नाहीत. चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात, त्यांनी असा सक्त इशारा दिला आहे की वाईट गुण असलेला मुलगा घराण्यावर कलंक लावतो. तुम्ही शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या गोष्टी आधीच शिकवल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या मुलांना चांगले आणि वाईट याबद्दलही सांगितलं पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गावर मार्गदर्शन केलं पाहिजे.

(सूचना: येथे दिलेली माहिती केवळ प्रचलित समजुतींवर आधारित आहे. ही माहिती पूर्णपणे खरी किंवा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध आहे असे मानू नका.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us