Feng Shui : फेंग शुईचे हे चार नियम नेहमी लक्षात ठेवा, घर पैशांनी भरून जाईल

फेंग शुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे, ज्या पद्धतीने वास्तुशास्त्र काम करते, त्याच आधारावर फेंग शुई देखील काम करते. फेंग शुईमध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचं पालन केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही. आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

Feng Shui : फेंग शुईचे हे चार नियम नेहमी लक्षात ठेवा, घर पैशांनी भरून जाईल
Feng Shui
| Updated on: Feb 13, 2026 | 8:35 PM

फेंग शुई हे एक चीनी शास्त्र आहे. ज्याला सोप्या भाषेमध्ये वास्तुशास्त्र देखील म्हटलं जातं. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्र हे पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेक्टिव्ह ऊर्जा या आधारावर कार्य करतं, त्याच आधारावर फेंग शुई देखील कार्य करतं. फेंग शुईनुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू तुम्ही ठेवल्या आहेत, त्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. त्यामुळे नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी तुम्ही घरात कोणत्या वस्तू ठेवत आहात, तुम्ही त्या वस्तू ज्या दिशेला ठेवल्या आहेत ती दिशा योग्य आहे का? अशा अनेक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असंत या सर्व गोष्टींसंदर्भात फेंग शुईमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार अशा काही गोष्टी आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव हा तुमच्या आयुष्यावर पडतो, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

धनाशी संबंधित उपाय – जर तुमच्या घरात कायम पैशांची अडचण असेल, हातात आलेल्या पैसा टिकत नसेल, तर त्यासाठी फेंग शुईमध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. फेंग शुईमध्ये सांगितल्यानुसार तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एखादी पाण्याशी संबंधित वस्तू ठेवा, जसं की एखादा फाउंट, मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही एका जागेवर स्थिर असलं नाही पाहिजे, फेंग शुईमध्ये वाहात्या पाण्याला खूप शुभ मानलं गेलं आहे. वाहात्या पाण्याला फेंग शुई शास्त्रामध्ये धन आणि संपत्तीच प्रतिक मानलं गेलं आहे. तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला एखाद्या वाहत्या नदीचं किंवा झऱ्याचा फोटो देखील लावू शकता, त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते.

घरात ही झाडं ठेवा – फेंग शुईनुसार घरात काही झाडं ठेवणं देखील शुभ मानलं गेलं आहे, ज्यामध्ये मनी प्लांट, आणि लकी बॉम्बू या सारख्या झाडांचा समावेश होतो. या झाडांना वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

फेंग शुईनुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच ऊर्जा ही आत येत असते, त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

फेंग शुईनुसार ज्या वस्तु वापरात नाहीत किंवा तुटल्या आहेत अशा वस्तू तसेच भंगार सामान कधीही घरात ठेवू नये, त्यांना घरातून बाहेर काढावं, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते, तसेच तुमची प्रगती होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)