Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा या चार वस्तू, मिळेल पैसाच पैसा, फेंग शुई शास्त्र काय सांगतं?

फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्या अत्यंत शुभ मानल्या जातात. अशा गोष्टी ऑफिसच्या डेस्कवर किंवा घरात ठेवण्याचा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन, त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा या चार वस्तू, मिळेल पैसाच पैसा, फेंग शुई शास्त्र काय सांगतं?
feng shui
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 12, 2026 | 9:32 PM

फेंग शुई हे असं शास्त्र आहे, जे सकारात्माक आणि नकरात्मक ऊर्जा अशा दोन मुख्य घटकांवर काम करतं. फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात. तर जेव्हा सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा घरातील वातावरण हे आनंदी असतं. फेंग शुईशास्त्रानुसार चांगलं यश मिळवण्यासाठी केवळ कष्ट करणंच महत्त्वाचं नसतं, तर त्या कष्टाला सकारात्मक ऊर्जेची जोड देखील भेटली पाहिजे, तेव्हाच आपल्याला यश मिळतं. फेंग शुईशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्याचा तुमच्या आणि तुमच्या घरातील सदस्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो, अशा गोष्टी घरात असतील तर वाईट शक्तीपासून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होतं, आज अशाच काही गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

क्रिस्टल ग्लोब – फेंग शुईनुसार ज्यांची नोकरी आंतरराष्ट्रीय क्षेत्राशी संबंधित आहे, किंवा ज्यांचा संबंध हा आंतरराष्ट्रीय व्यापार, नोकरी यांच्याशी येतो, अशा लोकांनी त्यांच्या डेस्कवर एक सुंदर असा क्रिस्टल ग्लोब ठेवला पाहिजे. यामुळे या क्षेत्रातील तुमचं ज्ञान वाढण्यास मदत होते. तसेच तुमची प्रगती देखील झपाट्यानं होते. प्रमोशन मिळतं असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

गोल्डन मनी ट्री – तुम्हाला गोल्डन मनी ट्री सहज उपलब्ध होऊ शकतं, आजकाल सजावटीमध्ये गोल्डन मनी ट्रीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फेंग शुईनुसार गोल्ड मनी ट्रीला धन संपत्ती आणि पैशांचं प्रतिक मानलं जातं. ऑफिस डेस्कवर दक्षिण पूर्व दिशेला गोल्डन मनी ट्री ठेवल्यास त्याचा तुम्हाला मोठा फायदा होतो. आयुष्यात कधीही पैसांची कमी भासत नाही.

कामधेनु गाईची प्रतिमा – हिंदू धर्मशास्त्रामध्ये गाईला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. कामधेनु गाय हे तुमच्या इच्छापूर्तीचं प्रतिक आहे. जर तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कामधेनु गाय असेल तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असं मानलं जातं.

पळणारे घोडे – तुम्ही तुमच्या ऑफिसच्या भिंतीवर पळणाऱ्या घोड्याची प्रतिमा लावू शकता, यामुळे ऑफिसमध्ये सतत पॉझिटिव्ह ऊर्जा राहते,असं बोललं जातं. एवढंच नाही तर तुम्ही ही प्रतिमा तुमच्या घरात देखील लावू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us