चक्क दिवसा होणार अंधार, सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर अनेक बदल, तब्बल इतके मिनिटे…

सूर्यग्रहणाच्या काळात मोठे बदल होताना दिसतात. यंदाच्या वर्षीचे पहिले ग्रहण फेब्रवारी महिन्यात दिसणार आहे. हे ग्रहण नक्की कुठे कुठे दिसेल, याबद्दल जाणून घ्या.

चक्क दिवसा होणार अंधार, सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर अनेक बदल, तब्बल इतके मिनिटे...
solar eclipse
| Updated on: Jan 25, 2026 | 8:41 AM

सूर्यग्रहण म्हटले की, लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. ग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल होताना दिसतात. हा दिवस खगोलशास्त्रांसाठी महत्वाचा असतो. बऱ्याचदा सूर्यग्रहणावेळी दिवसा काही सेकंद किंवा मिनिटे पूर्णपणे अंधार होतो. प्रकाश नाहीसा देखील होतो. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याभोवती अनेक हालचाली होताना दिसतात. खगोलीय दृष्टा ग्रहणाचा कालावधी खूप जास्त महत्वाचा ठरतो. संशोधन यादरम्यान केली जातात. दिवसा पृथ्वीवर आपल्याला मोठे बदल होताना दिसतात. ग्रहणाचा प्रभाव बराचवेळी टिकतो. विशेष म्हणजे 2026 चे पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात दिसणार आहे. काही सेकंद हे ग्रहण टिकणार आहे. सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी केली जात आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण दिसणार असल्याची माहिती आहे.

2026 चे पहिले सूर्यग्रहण मंगळवारी 17 फेब्रुवारी 2026 रोजी दिसेल. हे सूर्यग्रहण वलयाकर ग्रहण असेल. ज्याला रिंग ऑफ फायर म्हटले जाते. वलयाकार सूर्यग्रहणमध्ये सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. यादरम्यान सूर्याच्या बाजूने उजेड दिसतो. बाकी संपूर्ण अंधार राहतो. हा एक वेगळा आणि खास अनुभव असतो. सूर्य पूर्णपणे काळा होतो आणि त्याच्या बाजूने लाल रंग दिसतो.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीपासून तुलनेने जास्त अंतरावर असतो, त्यावेळी सूर्यासमोर येतो तेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. सूर्यप्रकाश चंद्राभोवती एका तेजस्वी वलयाच्या रूपात दिसतो आणि बाजूला सर्व लाल रंगत दिसतो. भारतामध्येही या सूर्यग्रहणाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये. म्हणजेच भारतातील लोकांना रिंग ऑफ फायर थेट पाहता येणार नाही.जगातील इतर अनेक भागात, ही खगोलीय घटना स्पष्टपणे दिसेल आणि लोक बघू शकणार आहेत. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अटलांटिक महासागर यासोबतच काही भागात दिसेल. बऱ्याचदा सूर्यग्रहणाच्या कालावधीत सूतक पाळले जाते. ग्रहण संपल्यानंतर लोक घरातील सर्व कपडे आणि भांडी धुतात. अनेक गोष्टी ग्रहणामध्ये पाळल्या जातात.