भगवान विष्णूचे ‘हे’ चार चमत्कारिक मंदिर; जिथे मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण!

| Updated on: Jun 04, 2022 | 3:37 PM

असे मानले जाते की, दररोज भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि धन आणि वैभव प्राप्त होते.

भगवान विष्णूचे हे चार चमत्कारिक मंदिर; जिथे मागितलेल्या सर्व इच्छा होतात पूर्ण!
Follow us on

भगवान विष्णू (Bhagwan Vishnu) ज्यांना जगाचा तारणहार म्हणून ओळखले जाते. ते कधी मरियदा पुरुषोत्तम रामाच्या रूपात तर कधी कृष्णाच्या (Shri Krisna) रूपात पापांच्या नाशासाठी अवतरले. भगवान विष्णूच्या मोहिमांचे वर्णन अनेक हिंदू पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये आढळते. शास्त्रानुसार गुरुवारी विष्णूजींची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. कलयुगातही भगवान विष्णूंप्रती भक्तांमध्ये खूप श्रद्धा आहे. शास्त्रानुसार विष्णु मंत्राचा नियमित जप केल्यास ते खूप फलदायी ठरते. विशेषत: वैशाख, कार्तिक आणि श्रावणात विष्णूची उपासना अधिक फलदायी असते. असे मानले जाते की दररोज भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि धन आणि वैभव प्राप्त होते. त्याचबरोबर भगवान विष्णूची अशी काही मंदिरे आहेत (miraculous temples of Lord Vishnu), जिथे केवळ दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते.

 

भगवान विष्णूंचे प्रसिद्ध मंदिर

  1. रंगनाथ स्वामी मंदिर- तामिळनाडू (Ranganath swami Temple Tamilnadu)
    भगवान श्रीहरीचे हे भव्य मंदिर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम येथे कावेरी नदीच्या काठी वसलेले आहे. भगवान विष्णूचे रंगनाथ रूप आणि मंदिराची भव्यता पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे गोदावरी आणि कावेरी नद्यांच्यामध्ये बांधलेले आहे. पृथ्वीचे बैकुंठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पवित्र स्थानी कृष्ण दशमीच्या दिवशी कावेरी नदीत स्नान केल्यास आठ तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
  2. बद्रीनाथ धाम- उत्तराखंड (Badrinath Dham Uttarakhand)
    हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एक आणि जगातील आठवे बैकुंठ, बद्रीनाथ धाम हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे मंदिराच्या गर्भगृहात विष्णूसोबत नर नारायणाची मूर्तीही स्थापित आहे. बद्रीनाथचे दरवाजे उघडल्याची माहिती मिळताच येथे भाविकांची गर्दी झाली आहे. या मंदिराचे दरवाजे बंद करताना प्रज्वलित केलेली ज्योत दरवाजे उघडेपर्यंत तेवत राहते, असे म्हणतात. हा चमत्कार पाहण्यासाठी दूरवरून लोकं  येतात.
  3. हे सुद्धा वाचा
  4. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर- महाराष्ट्र (Vitthal Rukmini Temple Maharashtra)
    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे विठुरायाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात आहे. हे मंदिर विठ्ठल आणि रुक्मिणी, भगवान विष्णूचे एक रूप आहे असे मानले जाते. या मंदिराजवळ भीमा नदी असून तिथल्या स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे.
  5. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर- तिरुपती
    भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक, तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपतीजवळील तिरुमला टेकडीवर वसलेले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भगवान व्यंकटेशाच्या दर्शनासाठी येतात. लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक असण्यासोबतच हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य आणि शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे.

(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध नाही)