
गणेश चतुर्थीला घराच्या विशेष कोपऱ्यात दिवे लावल्याने घरात आनंद, समृद्धी नांदते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. गणेश चतुर्थीच्या पुढील ठिकाणी दिवे लावणे फायदेशीर ठरेल.

गणेश चतुर्थीच्या खास दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा लावा. या ठिकाणी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल, तसेच गणतपी बाप्पा तुमच्या आयुष्यातील चांगले दुःख दूर करेल.

गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावा, यामुळे बाप्पाासह तुळशी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तुळशीजवळ लावलेला दिवा तुमच्या घरात सकारात्मकता वाढवतो.

या खास दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान कोनात दिवा लावा. वास्तुशास्त्रात हे स्थान देवाला समर्पित मानले जाते. यामुळे धनलाभ होतो.

गणेश चतुर्थीला घराच्या स्वयंपाकघरात दिवा लावल्याने तुम्हाला चांगला लाभ होईल. (ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे, TV9 मराठी याचे समर्थन करत नाही)