
आज अनंत चतुर्दशी आहे. गणरायाला निरोप देण्याचा हा दिवस... ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघत आहेत.

मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात मिरणुकीला सुरुवात झाली आहे.

लालबागचा राजाच्या मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. लालबागचा राजाचा रथ मंडपातून बाहेर निघाला आहे.

लालबागचा राजा मंडपाच्या मुख्यप्रवेश द्वारावर आला तेव्हा पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांची अन् रंगांची उधळण करत लालबागच्या राजाचं मंडपाबाहेर स्वागत केलं गेलं.

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त सध्या लालबाग परिसरात आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविक आतुर आहेत.

विसर्जन मिरवणुकीची ही दृश्ये आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन गणेश भक्तांनी घेतलं.