Rashifal : गुरु होणार हिंदु नववर्षाचे महागुरु, या 5 राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम होणार सुरु

Hindu Nav Varsha 2026 Rashifal: या हिंदु नववर्षाच्या सुरुवातीलाच गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर गुरुचा प्रवेश कर्क राशीत होणार आहे आणि वर्षाच्या शेवटी सिंह राशीत गुरुचा प्रवेश होणार आहे. तसेच राहुचा आधी कुंभ आणि नंतर मकर राशीत प्रवेश होईल. शनी देव संपूर्ण वर्षभर मीन राशीत राहणार आहेत. ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक असणार आहे.

Rashifal : गुरु होणार हिंदु नववर्षाचे महागुरु, या 5 राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम होणार सुरु
Hindu Nav Varsha 2026
| Updated on: Mar 08, 2026 | 8:51 PM

Hindu Nav Varsha 2026: यंदा गुढी पाडव्याला १९ मार्चपासून हिंदू नववर्षाचा आरंभ होत आहे. १९ मार्च रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीच्या शुभारंभ होत आहे. पंचांग आणि ज्योतिषीय गणनेनुसार या वर्षी ग्रहांची स्थिती खूप महत्वाची असणार आहे. या नव संवत्सरचे राजा गुरु असणार आहेत. कारण हे नव संवत्सर गुरुवारच्या दिवशी आरंभ होत आहे. तसेच मंत्री पद ग्रहांचे सेनापती मंगळाकडे असणार आहे.

मिथुन रास –

हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला गुरु मिथुन राशीत असणार आहेत. ही स्थिती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. यामुळे आर्थिक प्रकरणातील सुधारणा पाहायला मिळणार आहे. करीयरमध्ये पुढे जाण्याची नामी संधी चालून येणार आहे.

तुळ रास –

तुळ रास ही शुक्र रास आहे. हिंदु नववर्षाची सुरुवात तुळ राशीच्या जातकांना करियरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. व्यापारात असलेल्यांना मोठा लाभ होईल.

धनु रास –

हिंदू नववर्षाची सुरुवात धनु राशीसाठी खूप चांगली होऊ शकते. यावेळी धनु राशीच्या लोकांची रुची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वाढू शकते. उत्पन्नाचे नवे रस्ते खुले होऊ शकतात,त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारण होऊ शकते.

मकर रास –

मकर राशीच्या लोकांसाठी वर्षाचा मध्य भाग खास करुन चांगला जाणार आहे. अर्धवट राहिलेली काम हळूहळू पूर्ण होऊ शकतील. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

मीन रास –

मीन राशीच्या लोकांना हे नववर्षे मिळते आणि जुळते परिणाम आणू शकते. वर्षाची सुरुवातीला काही प्रकरणात चढ आणि उतार येऊ शकतो. पुढे जाऊन परिस्थिती चांगली होऊ शकते.

( Disclaimer: या माहिती ज्योतीष शास्त्राच्या नियमांवर आधारित आहे. या बातमीला टीव्ही ९ मराठी दुजारो देत नाही )

Follow Us