
योग केवळ शरीराची लयबद्ध आकार बनवणे किंवा श्वास घेण्याचा प्रकार नसून यामागे देखील एक विज्ञान आहे. जे आपले शरीर, मन आणि आत्मा यांना संतुलित करण्याचे काम करते. योग की खास आणि असरदार विधी म्हणजे हस्तमुद्रा… म्हणजे बोटे आणि हातांनी केलेल्या खास आकृत्या. ज्या शरीराची ऊर्जा संतुलित करतात. मुद्रा दिसायला जरी सोप्या वाटत असल्या तरी त्याचा परिणाम मोठा असतो.त्या आपल्या शरीराची ऊर्जा,नसा,हार्मोन आणि मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे शरीरात सकारात्मक बदल होऊ लागतात आणि अनेक रोगांपासून आराम मिळतो.
प्राचीन योग ग्रंथ आणि पतंजली योगसूत्र सह बाबा रामदेव यांचे पुस्तक Its Philosophy and Practice मध्ये म्हटले आहे की मुद्रा ना केवळ शरीराच्या आरोग्यासाठी फायदेमंद नसून मानसिक शांती आणि स्वविकासास मदत करतात. बाबा रामदेव यांच्या मते आपले शरीर पांच तत्वांपासून बनलेले आहे. अग्नि, जल, वायू,पृथ्वी आणि आकाश. जेव्हा या तत्वांत असंतुलन होते. तेव्हा शरीरासंबंधी आजार होऊ लागतात. परंतू मुद्राद्वारे आपण असंतुलनाला ठीक करु शकतो. तर चला पाहूयात मुद्रा किती प्रकारच्या असतात आणि त्यांना करण्याची योग्य पद्धत काय आहे ? ज्या शरीरास फायदेशीर असतात.
योग आणि आयुर्वेदात मुद्राचे विशेष महत्व आहे. सोप्या शब्दात म्हणायचे झाले तर मुद्रा एक विशेष प्रकारच्या हात आणि शरीरासंदर्भातील स्थिती असते. जी मन, शरीर आणि ऊर्जाच्या दरम्यान संतुलन बनवण्यास मदत करते. आपल्या हातांच्या बोटांवर वेगवेगळे ऊर्जा केंद्रं ( नाडी ) असतात. आणि आपण जेव्हा बोटांना खास प्रकारे आकार देतो तेव्हा शरीरातील एनर्जीचा फ्लो बॅलन्स होतो. ही प्रक्रीया केवळ मानसिक शांतीच देत नाही तर शारीरिक रोगांमध्येही लाभदायक मानली जाते.
तसे तर मुद्रा अनेक प्रकारच्या असतात परंतू आज आपण ५ प्रकारच्या हस्त मुद्रांबाबत जाणून घेणार आहोत. यात ज्ञान मुद्रा, वायु मुद्रा, प्राण मुद्रा, सूर्य मुद्रा आणि लिंग मुद्रा यांचा समावेश आहे. योग शास्त्रात हस्त मुद्रा अत्यंत प्रभावशाली तंत्र मानले जाते. जी शरीराच्या ऊर्जेला नियंत्रित आणि संतुलीत करते. मुद्रा केवळ हातांच्या बोटांना विशेष प्रकारे एकत्र करण्याचा अभ्यास नाही तर हा आपल्या शरीर,मन आणि आत्मा संतुलित करण्याचेही तंत्र आहे. चला त्यासाठी या मुद्रांचा विस्ताराने अभ्यास करुया…
ही मुद्रा करण्यासाठी आपली तर्जनी (index finger) आणि अंगठ्याला (thumb) हळुवार मिळवावे. उर्वरित तीन बोटांना सरळ ठेवावे. डोळे बंद करावे आणि सामान्यरुपाने श्वास घ्यावा.या मुद्रेला केल्याने कॉन्सेंट्रेशन चांगले होते आणि नकारात्मक विचार बंद होणार आहेत. तसेच हा प्रकार मेंदू सक्रीय करण्यासाठी लाभदायक आहे.जर मुलांनी हे नियमित केले तर ती बुद्धीमान बनतात. या मुद्रेने रागावर नियंत्रण करता येते. जर चांगले परिणाम हवे असतील तर ज्ञान मुद्रा केल्यानंतर प्राण मुद्राही करु शकता.
ही मुद्रा करण्यासाठी आपली तर्जनी वाकवावी आणि अंगठ्याच्या मुळात ठेवावी. अंगठ्याने तर्जनीला हलके दाबावे. इतर बोटे सरळ ठेवावी. दोन्ही हातांनी ही मुद्रा करुन गुडघ्यावर ठेवावी. ही मुद्रा वाताशी संलग्न समस्या उदा. गॅस, संधीवात, सांधेदुखीत आराम देते. जर तुम्हाला मान आणि मणक्यात दुखत असेल तर या मुद्रेला करु शकता. ही मुद्रा ब्लडसर्क्युलेशन वाढवण्यास मदत करते. परंतू यास नियमित रुपाने करणे गरजेचे असते. तसेच वात कमी झाल्यानंतर मुद्रेला बंद करणे योग्य आहे.
प्राण मुद्रा करण्यासाठी अंगठ्याला रिंग फिंगर आणि करंगळीने एकत्र करावे. तर्जनी आणि मध्य बोट सरळ ठेवावे. तसेच दोन्ही हातांनी ही मुद्रा बनवून गुडघ्यावर ठेवावे. ही मुद्रा शरीराला एक्टीव्ह, स्वस्थ आणि एनर्जेटिक बनवते. याचा अभ्यास डोळ्यांची समस्या दूर करणे आणि नजर चांगली करण्यास फायदेशीर ठरतो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मुद्रेने शरीरातील विटामिन्सची कमतरता दूर होते थकवा दूर होतो. भूक आणि तहान मिटते. त्यामुळे उपवासाच्या वेळी ही मुद्रा तुम्ही करु शकता. या मुद्रेने झोप देखील चांगली येते.
सूर्य मुद्रा देखील खूपच लाभकारी आहे. ही मुद्रा करण्यासाठी रिंग फिंगरला वाकवा आणि अंगूठ्याने हलके दाबा आणि इतर बोटे सरळ ठेवावीत त्यानंतर दोन्ही हातांनी ही मुद्रा करावी आणि गुडघ्यावर हात ठेवावा. या मु्द्रेचे फायदे पाहाता याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. पचन यंत्रणा चांगली होते. ताण तणाव दूर होतो. शरीरातील ताकद वाढवणे आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉलकीम करण्यातही फायदेशीर आहे. या मुद्रेला केल्याने लिव्हर आणि डायबिटीसची समस्येत आराम मिळतो.
सावधान : ही मुद्रा कमजोर वा दुर्बल व्यक्तीनी करु नये. तसेच उष्णतेच्या दिवसात ही मुद्रा अधिक करु नये. कारण याने शरीरातील उष्णता वाढते. जास्त वेळ ही मुद्रा केल्याने शरीरात थकवा आणि जळजळ आणि उष्णतेचे अन्य विकार होऊ शकतात.
लिंग मुद्रा करताना दोनों हातांच्या बोटांना एकमेकांत अडकवायचे आहे. डाव्या हातांचा अंगठावर ठेवायचा आहे.उजव्या हाताच्या मुठीने त्याला घेरावे. छातीजवळ ही मुद्रा करावी आणि सरळ बसावे. या मुद्रेमुळे शरीरातील अंतर्गत उष्णता वाढते. ही मुद्रा सर्दी, ताप, अस्थमा, खोकला,सायनस, लकवा (पॅरालिसिस) आणि लो ब्लडप्रेशरसारख्या समस्येत लाभकारी मानली जाते. शरीरात जमलेले कफ आणि सर्दी सुखविण्यास ही मुद्रा मदत करते. त्यामुळे श्वासाशी संबंधित आजारात लाभ होतो.
सावधान : या मुद्रेचा सराव करताना शरीरातील उष्णता वाढते, म्हणून शरीराचे संतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी, फळांचे रस, तूप आणि दूध याचे सेवन करावे. या मुद्रेचा सराव जास्त वेळ करू नये, अन्यथा शरीरात जास्त उष्णता निर्माण होऊ शकते.