Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा, अन्यथा आर्थिक नुकसान भोगावं लागेल

| Updated on: Nov 16, 2021 | 9:48 AM

पंचतत्त्वांवर आधारित वास्तू नियम हे आपल्या सुख-समृद्धीशी निगडित आहेत, त्यामुळे घर बांधताना आणि सजवताना कधीही वास्तु नियमांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा, अन्यथा आर्थिक नुकसान भोगावं लागेल
main hall
Follow us on

मुंबई : पंचतत्त्वांवर आधारित वास्तू नियम हे आपल्या सुख-समृद्धीशी निगडित आहेत, त्यामुळे घर बांधताना आणि सजवताना कधीही वास्तु नियमांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. घराचा मुख्य भाग म्हणजे ड्रॉईंग रूम घरात आलेले पाहूणे किंवा महत्त्वाची व्यक्ती आल्यास आपण त्यांना येथेच बसवतो.
त्यामुळे ड्रॉईंग रूम बनवताना आणि सजवताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया की वास्तुनुसार ड्रॉईंग रूम सजवताना सोफा, टीव्ही सेट इत्यादीची कोणती जागा योग्य आहे.

सर्वात आधी तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवलेल्या सोफा किंवा दिवाण नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. वास्तूनुसार ही दिशा शुभ मानली जाते.

वास्तूनुसार जेव्हा तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये समोरच्या भिंतीवर तुमच्या कुटुंबाचे फोटे लावा ही गोष्ट खूप शुभ असते. हे चित्र नेहमी लाल रंगाच्या फ्रेममध्ये ठेवा. घरातील परिवारातील लोकांचे हसरे चेहरे पाहील्यावर घरात अलेल्या प्रत्येकाला प्रसन्न वाटेल.

ड्रॉईंग रूममध्ये हे वास्तु उपाय केल्याने समाजात तुमचा आदर आणि तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. फॅमिली फोटो प्रमाणेच तुम्ही हंसाचा फोटो भिंतीवर देखील लावू शकता.

वास्तूनुसार ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही नेहमी आग्नेय कोनात ठेवावा. टीव्ही कधीही ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नये. त्याचप्रमाणे टेलिफोन देखील आग्नेय कोनात किंवा पूर्व दिशेला ठेवावा. आग्नेय कोनात म्युझिक सिस्टीम सारख्या मनोरंजनाच्या वस्तू असणे देखील शुभ आहे.

वास्तूच्या नियमांनुसार, ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही आणि फोनसाठी आग्नेय कोन ही सर्वोत्तम जागा आहे, परंतु ही जागा कूलरसाठी अजिबात योग्य नाही. कूलर नेहमी पश्चिम दिशेला ठेवावा. वास्तूनुसार ड्रॉईंग रूममधील एसी पश्चिम कोनात आणि हिटर आग्नेय कोनात असावा.

वास्तूनुसार ड्रॉईंग रूमच्या भिंतींवर नेहमी हलके रंग लावावेत. त्याचप्रमाणे ड्रॉईंग रुममधील खिडकी आणि स्कायलाइटचे ग्लास फिकट रंगाचे असावेत. शक्य असल्यास, ते पारदर्शक ठेवा, जेणेकरून बाहेरून पुरेसा प्रकाश येईल.

वास्तूत वास्तूनुसार बदल केल्यास तुम्हाला सामाजिक मान सन्मान आणि कुंटुंबीक सुख मिळेते अशी मान्यता आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या : 

Numerology Today 15, November 2021| सरळ मार्गी, धैर्यवान, प्रगल्भ बुध्दीमत्ता जाणून घ्या शुभ अंक 03 असणाऱ्या लोकांबद्दल सर्वकाही

Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 6 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा

Vastu shastra | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही आहे? मग हे वास्तु बदल करुनच पाहा