AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक तंगीने असाल त्रस्त तर शनीवारी करा हे उपाय, गरिबी जाईल कोसो दुर

असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय केल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया शनिदेवाशी संबंधित काही खास उपाय.

आर्थिक तंगीने असाल त्रस्त तर शनीवारी करा हे उपाय, गरिबी जाईल कोसो दुर
शनिदेवImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 11, 2023 | 3:09 PM
Share

मुंबई, शनिवार हा शनिदेवाला (Shaniwar Upay) समर्पित मानला जातो. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच असे म्हटले जाते की शनिदेवाची पूजा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्याकडून कोणतीही चूक होतो कामा नये. ज्योतिष शास्त्रातही शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय केल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया शनिदेवाशी संबंधित काही खास उपाय.

शनिवारशी संबंधित विशेष उपाय

  1. असे मानले जाते की शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना घोड्याचा जोडा अर्पण केल्यास जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते.
  2. शनिवारी सकाळी लवकर उठून पिठात साखर आणि काळे तीळ मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. यासोबतच शनिदोष दूर करण्यातही हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
  3. काळे तीळ, काळी घोंगडी आणि उडीद डाळ यासारख्या काही खास गोष्टी शनिवारी गरीब किंवा गरजूंना दान केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो.
  4. जर तुम्हाला आयुष्यात खूप अपघात होत असतील तर अशा परिस्थितीत घरीच रोट्या बनवा आणि त्यावर मोहरीचे तेल लावा आणि काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे अपघात कमी होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील.
  5. जर एखाद्या व्यक्तीला घरात काही समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी सूर्योदयापूर्वी एका भांड्यात मोहरीचे तेल ठेवा आणि त्यात आपला चेहरा पहा. चेहरा पाहून ते तेल दान करा. असे केल्याने कौटुंबिक समस्या दूर होतील.

सुख समृध्दीसाठी करा हे उपाय

शनिवारी करा हे 5 उपाय

  1. शनिवारी पिंपळाच्या 11 पानांचा हार बनवावा. आजवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी. हार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे कोर्ट-कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील.
  2. शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा. परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे. असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल.
  3. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.
  4. शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्या. तसेच ‘शं शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल.
  5. शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडी साखर घाला. हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. तसेच ‘ओम ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले