Astro Tips | “कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल” एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा

| Updated on: Dec 20, 2021 | 1:16 PM

प्रत्येक दिवस वेगळा असतो त्याच प्रमाणे प्रत्येक दिवसाची पुजा करण्याची पद्धत देखील वेगळी असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिवशी कशी पुजा करावी.

Astro Tips | कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा
mythological belief
Follow us on

मुंबई : आयुष्यात पैसा कोणाला नको असतो. प्रत्येक जण आपल्या प्रियजनांसाठी आयुष्यात पैसे कमावतो. त्यासाठी खूप मेहनत घेतो. पण कधी कधी कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. त्यासाठी नशीबाची जोड लागते. पुराणामध्ये देखील असे पुरावे मिळतात .  सुदामाचा खास मित्र साक्षात भगवान कृष्ण असूनही त्याच्या आयुष्यातील दु:ख कमी झाले नाही. शास्त्रात यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत.  चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिवशी कशी पुजा करावी.

सोमवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
सोमवारी हा दिवस भगवान शंकराला समर्पित करण्यात आला आहे. जर या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करून तुम्ही शंकराची मनोभावे पुजा केलीत तर तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील. याचा फायदा तुम्हाला करिअरमध्ये देखील होईल. करिअरचा योग्य मार्ग निवडण्यात तुमचा गोंधळ असेल तर तुम्ही यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपायांचा अवलंब करू शकता. सोमवारी पांढरे कपडे घाला आणि काळा रंग टाळा.

मंगळवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी लाल रंगाचे कपडे घाला. हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करेल आणि तुम्हाला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता देईल. मंगळवारी घरातून बाहेर पडण्यापूर्वी कोणत्याही स्वरूपात कोथिंबीरचे सेवन करा. कोथिंबीरचे सेवनामुळे शुभ संकेत येतील अशी मान्यता आहे.

बुधवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
बुधवार आपल्या लाडक्या बप्पाला समर्पित केला आहे. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमची बिघडलेली कामसुद्धा साध्या होतील. बुधवारी गणेशाला सिंदूर अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील दु:ख दुर होतील.

गुरुवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
गुरुवारचे दैवत विष्णू आहे. यशस्वी प्रवासासाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. यामुळे तुमचा प्रवास फलदायी होईल. गुरुवारचा रंग पिवळा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पिवळे कपडे घालावेत.

शुक्रवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस धनाशी संबंधित प्रसंगांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीला कमळ किंवा गुलाबी रंगाचे फूल अर्पण करावे. शुभेच्छांसाठी, आपण आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी फुले ठेवू शकता. याशिवाय घरातून निघण्यापूर्वी दही खा यामुळे तुमची बिघडलेली कामे सुद्धा नक्की होतील.

शनिवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
शनिदेव हा शनिदेवाचा स्वामी आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काळी वांगी अर्पण करा. यामुळे तुमची समस्या दूर होण्यास मदत होईल. या उपायाने तुमचे भाग्यही वाढेल.

रविवारी पुजा करताना या गोष्टींचा विचार करा
सूर्य हा रविवारचा देव आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला कोणत्याही वादाचा किंवा संघर्षाचा सामना करावा लागत असेल, तर ते सोडवण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.