
आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ, विचारवंत आणि राजनीतीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्यनीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आज आपण चाणक्य यांच्या त्या नीतींबाबत चर्चा करणार आहोत, ज्याचा फायदा हा कॉरपोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकतो.
नेतृत्व – आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही जेव्हा एखाद्या समूहाचं नेतृत्व करत असतात तेव्हा फक्त प्रामाणिकपणाने काम होत नाही तर त्याच्यासोबत एका विशिष्ट रणनीतीची देखील आवश्यकता असते.तुम्हाला जे वाटतं त्याबद्दल तुम्ही ऑफीसमध्ये बोललं पाहिजे. मात्र ते बोलत असताना कधी, कसं, कोणासमोर बोलत आहात याचं देखील भान तुम्हाला असायला हवं. समजदारीनं काम करणं हीच खरी लिडरशिप असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पूर्ण नियोज करा – आर्य चाणक्य म्हणतात कोणतंही काम करण्यापूर्वी त्याचं पूर्ण नियोजन तयार करा. तुम्ही जेव्हा एखादं नवं काम सुरू करता तेव्हा ज्या पद्धतीनं नियोजनाची गरज असते तशाच पद्धतीने कोणतंही काम करताना आधी तुम्ही कामाचं नियोजन करा, आणि मग कामाला सुरुवात करा तुम्हाला यश नक्की मिळेल.
दुसऱ्यांच्या चुकातून धडा घ्या – आर्य चाणक्य यांनी ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ऑफीसमध्ये काम करत असताना अनेकांकडून चुका होत असतात. मात्र तुम्हाला गरज असते ती त्या चुकांमधून धडा घेण्याची. तुमच्या सहकाऱ्याने जर एखादी चूक केली तर त्या चुकीतून तुम्ही शिका आणि पुन्हा तीच चूक करू नका.
स्वत:ला कणखर बनवा – आर्य चाणक्य म्हणतात व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यामुळे तुम्ही स्वत:ला कणखर बनवा.
कोणालाही दुखवू नका – आर्य चाणक्य यांनी हा सर्वात महत्त्वाचा गुण सांगितला आहे, क्षेत्र कोणतही असो, तुमच्या सहकार्याला तुमच्या व्यवहारामुळे दुखवू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.