
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर अनेक बदल होतात. 2026 चे पहिले चंद्रग्रहण लवकरच असेल. हे चंद्रग्रहण पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि सिंह राशीत होणार आहे. या ग्रहणाचे अशुभ परिणाम थेट पाच राशींवर होतील. यासोबत काही तास हे ग्रहण राहणार आहे. यादरम्यान चंद्राभोवती आपल्याला अनेक बदल जाणवतील. धार्मिक आणि ज्योतिषीय दोन्ही दृष्टिकोनांतून खगोलशास्त्रीय घटना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू पंचांगानुसार, 4 मार्चला चंद्रग्रहण भारतात दिसेल. चंद्रग्रहण सुमारे 3 तास 27 मिनिटे चालेल आणि त्याचे परिणाम होळीच्या सणादरम्यान जाणवू शकतात. ग्रहण म्हटले की, आपल्याकडे अनेक गोष्टी पाळल्या जातात. विशेष म्हणजे हे वर्षातील सर्वात मोठे ग्रहण म्हणावे लागेल. हे ग्रहण तब्बल 3 तासांपेक्षाही अधिक काळ चालेल.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी बंगालच्या ईशान्य भागात आणि यासोबतच भारतातील मिझोराम, नागालँड, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये दिसणार आहे. या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच ग्रहणाच्या काळात काही वेळ पूर्णपणे अंधार बघायला मिळेल. चंद्राचा रात्री पडणारा प्रकाश कमी होईल. यामुळे अंधार अधिक काळ असेल.
ग्रहण पहाटे 3.20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता संपेल. चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल 3 तास 27 मिनिटे असेल. चंद्रग्रहणाशी संबंधित सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होईल. भारतात मोठ्या प्रमाणात सूतक काळ पाळला जातो. बरेच लोक यादरम्यान काही शुभ काम करत नाहीत. फक्त शुभ कामच नाही तर सुतक काळ संपल्यानंतर घरातील सर्व कपडे आणि भांडेही अनेकजण घासतात.
ग्रहण काळ शास्त्रज्ञांसाठी महत्वाचा ठरतो. अनेक अभ्यास यादरम्यान केली जातात. चंद्रग्रहणादरम्यान अनेक बदल चंद्राभोवती होताना दिसतात. कधी एकदम प्रकाश तर मध्येच पूर्णपणे काळोखा होतो. 2026 चे हे पहिले चंद्रग्रहण असल्याने या ग्रहणाबद्दल चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. हे यंदाच्या वर्षाचे मोठे ग्रहण असल्याचीही माहतिती मिळत आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार नसून भारतातील काही ठरावीक भागातच दिसणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)