Parijat Plant: पारिजातकांचं झाड दारात असणं शुभ की अशुभ? जाणून घ्या

Parijat Plant at Home: पारिजातकाचं फुलं पाहून अनेकाचं मन प्रसन्न होतं. सकाळी सकाळी दारात पडलेल्या फुलांचा सडा पाहून आनंद होणं सहाजिकच आहे. पण वास्तुशास्त्रानुसार दारात हे झाड असं शुभ की अशुभ ते जाणून घ्या.

Parijat Plant: पारिजातकांचं झाड दारात असणं शुभ की अशुभ? जाणून घ्या
Parijat Plant: पारिजातकांचं झाड दारात असणं शुभ की अशुभ? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 10, 2026 | 8:08 PM

पारिजातक आपल्या दारात असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. कारण या झाडांच्या फुलांचा सडा एकदा का दारात पडला की दिवसाची सुरूवात एकदम मस्त होते. पारिजातकाची फुलं सुंदर आणि आकर्षक असतात. केशरी दांडी आणि पांढऱ्या पाकळ्यांमुळे ही फुलं मोहक वाटतात. इंग्रजीत या फुलांना नाइट ब्लूमिंग जॅस्मिन असं संबोधलं जातं. अनेक जण रातराणी म्हणून असाही उल्लेख करतात. खरं तर पारिजातकाच्या झाडाला आयुर्वेदात महत्त्व आहे. कारण त्यात औषधी गुणधर्म आहेत. होमोपेथी आणि आयुर्वेदात या झाडाच्या फुलांचा आणि पानांचा वापर केला जातो. इतकंच काय तर वास्तुशास्त्रातही या झाडाचं महत्त्व आहे. वास्तुनुसार, घराजवळ हे झाड लावलं तर सप्टेंबर महिन्यात त्याला फुलं येण्यास सुरूवात होते. डिसेंबरपर्यंत बहर राहतो. पारिजातकाची फुलं संध्याकाळी किंवा रात्री फुलतात. त्यामुळे आसपास सुगंध पसरतो. पारिजातकाशी निगडीत एक पौराणिक कथाही सांगितली जाते.

पारिजातकाबाबत पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी पारिजातकाचं झाल स्वर्गातून पृथ्वीतलावर आणलं. सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात हे झाड कुठे लावावं यावरून मतभेद होते. तेव्हा श्रीकृष्णांनी पारिजातकाचं झाड सत्यभामाच्या अंगणात अशा पद्धतीने लावली की त्याची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडतील. त्यामुळे दोघातील मतभेद संपुष्टात आले. घरात पारिजातक असं शुभ मानलं गेलं आहे. देवी लक्ष्मीला पारिजातक खूप प्रिय आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पारिजातकाचं झाड जिथे असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो.

कोणत्या दिशेला पारिजातकाचं झाड असावं

घराच्या मुख्य दाराजवळ पारिजातकाचं झाडं असणं शुभ मानलं गेलं आहे. हे झाड स्वर्गातील असल्याने त्याचं महत्त्व आहे. या फुलांच्या सुगंधामुळे तणाव कमी होतो. तसेच मनाला शांती लाभते. इतकंच काय तर वास्तुदोषही दूर होतो. यामुळे घरात सुख, शांती आणि आनंदी वातावरण राहते. वास्तुशास्त्रानुसार, पारिजातकाचं झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

Follow Us