भगवान विष्णूंच्या कल्की अवताराआधीच तयार होत आहे कल्की धाम, या विशेष कारणासाठी आहे चर्चेत 

| Updated on: Feb 20, 2024 | 2:08 PM

भगवान विष्णूचा दहावा अवतार असलेल्या कल्किचा अजून जन्म झालेला नाही. धार्मिक ग्रंथांनुसार, कलियुग 432000 वर्षे जुना आहे, जो सध्या पहिल्या टप्प्यात आहे. मान्यतेनुसार, जेव्हा कलियुगाचा शेवटचा टप्पा होईल तेव्हाच कल्कि अवताराचा जन्म होईल.

भगवान विष्णूंच्या कल्की अवताराआधीच तयार होत आहे कल्की धाम, या विशेष कारणासाठी आहे चर्चेत 
कल्की धाम
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात कल्की (Kalki Dham) मंदिराची पायाभरणी केली. हे देशातील पहिलेच असे अनोखे मंदिर असेल जिथे देवाचे मंदिर त्यांच्या जन्मापूर्वीच स्थापन केले जाईल. भगवान विष्णूचा दहावा अवतार असलेल्या कल्किचा अजून जन्म झालेला नाही. धार्मिक ग्रंथांनुसार, कलियुग 432000 वर्षे जुना आहे, जो सध्या पहिल्या टप्प्यात आहे. मान्यतेनुसार, जेव्हा कलियुगाचा शेवटचा टप्पा होईल तेव्हाच कल्कि अवताराचा जन्म होईल. त्यानंतर कलियुगात होणारी पापे नष्ट होतील. आत्तापर्यंत भगवान विष्णूने नऊ अवतारात जन्म घेतला आहे आणि कल्की हा त्यांचा शेवटचा अवतार असेल. संभळच्या कल्की मंदिराची पायाभरणी झाल्यापासून हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.  मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

कल्की मंदिराच्या गर्भगृहाचे वैशिष्ट्य

कल्की मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे गर्भगृह. वास्तविक या दहा गर्भगृहांमध्ये भगवान विष्णूचे वेगवेगळे अवतार स्थापित झाले आहेत. ज्यामध्ये मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, भगवान नरसिंह, वामन अवतार, श्री राम अवतार, श्री कृष्ण अवतार, परशुराम अवतार, बुद्ध अवतार आणि शेवटी कल्की अवतार यांचा समावेश आहे.

मंदिरात या धातूंचा वापर केला जाणार नाही

अयोध्येतील राम मंदिरात जे गुलाबी दगड वापरण्यात आले होते तेच गुलाबी दगड कल्की मंदिराच्या बांधकामात वापरण्यात येणार आहेत. हेच दगड सोमनाथ मंदिरातही वापरले गेले आहेत. मंदिराच्या शिखराची उंची 108 फूट ठेवली जाणार असून मंदिराचे व्यासपीठ 11 फूट उंच असेल. या मंदिरातही रामललाच्या मंदिराप्रमाणे लोखंड आणि स्टीलसारख्या धातूंचा वापर केला जाणार नाही.

हे सुद्धा वाचा

संभल ग्राम मुखनस्य ब्राह्मणस्य महात्मनः ।
भावने विष्णुयशासः कल्किः प्रदुर्भविष्यति।।

श्रीमद्भगवद्गीता पुराणातील या श्लोकानुसार भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्कि अवतार संभाळातच जन्म घेणार आहे. जो विष्णुयाश नावाच्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा पुत्र म्हणून जन्म घेईल. श्रीमद्भगवद्गीता पुराणातील बाराव्या मंत्रात कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या संधि कालखंडात भगवान कल्की अवताराचा उल्लेख आहे. मान्यतेनुसार, भगवान परशुराम कल्की अवताराला तलवार देतील आणि देव गुरु बृहस्पती त्याला शिक्षण आणि दीक्षा देतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)