घरातील देव्हाऱ्या संबंधित ‘हे’ नियम ठेवा लक्षात, अन्यथा गरिबी सोडणार नाही तुमची साथ

घरातील देवघर स्थापन करताना नियमांनुसार स्थापित केले तरच ते पूर्णपणे फायदेशीर ठरते. शिवाय देवघरा संबंधित नियमांचे पालन केले जाते. तर आजच्या लेखात आपण घरातील देवघरा संबंधित कोणते नियम नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत ते जाणून घेऊयात.

घरातील देव्हाऱ्या संबंधित हे नियम ठेवा लक्षात, अन्यथा गरिबी सोडणार नाही तुमची साथ
Devghar
| Edited By: | Updated on: Dec 26, 2025 | 5:24 PM

हिंदु धर्मात प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच. देवघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मनाला शातंता मिळते. त्याचबरोबर घरात वास्तुनुसार योग्य ठिकाणी देवघर असेल तर घरात शुभ ऊर्जेचा प्रवाह राहतो. देवघर किंवा पूजेसाठी एक निश्चित जागा असल्याने घरातील सर्व समस्या आपोआप दूर होतात. घरातील देवघरात पूजा केल्याने आर्थिक समृद्धी सुनिश्चित होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राखला जातो. तथापि वास्तुनूसार घरातील देवघर हे तेव्हाच पूर्णपणे फायदेशीर ठरू शकते जेव्हा ते निर्धारित नियमांनुसार स्थापित केले जाते. तर आजच्या लेखात आपण घरातील देवघरा संबंधित कोणते नियम नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत ते जाणून घेऊयात.

देवघराचे नियम

देवघर हे घराच्या ईशान्य कोपऱ्यात असले पाहिजे. एकदा देव्हारा निश्चित झाल्यानंतर ते बदलू नये. देवघर जिथे आहे तिथे हलका पिवळा किंवा पांढरा रंग असावा. जर देव्हाऱ्यात मूर्ती स्थापित करायची असेल तर ती 12 इंचापेक्षा जास्त मोठी नसावी. तथापि देव्हाऱ्यात कोणत्याही उंचीचे देवतांचे फोटो लावता येतात. जर देवघर हे अपार्टमेंटमध्ये असेल तर सूर्यप्रकाश विचारात घ्यावा. पूजास्थळी शंख, गोमती चक्र आणि पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.

सकाळ व संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी देव्हाऱ्यात दिवा लावावा. देव्हारा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. देवघराचा दरवाजा कधीही बंद ठेवू नये.

घरातील देव्हाऱ्यात या वस्तू ठेवू नका

घरातील देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. देव्हारा हे फक्त पूजास्थळ आहे. पूर्वजांचे फोटो देव्हाऱ्यात ठेवल्याने घरात गरिबी आणि आर्थिक समस्या वाढू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की देव्हाऱ्यात कधीही देव-देवतांचा तुटलेल्या अवस्थेत किंवा फाटलेल्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नयेत. पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर देव्हाऱ्यात ठेवू नका. तसेच मानत असलेले तुमचे साधु-संत जे जिवंत आहेत त्यांचे किंवा धार्मिक नेत्यांचे फोटो घरातील देव्हाऱ्यात ठेवू नयेत.

घरातील देव्हाऱ्या संबंधित या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला कधीच आर्थिक गोष्टींचा व नकारात्मक गोष्टींचा समाना करावा लागणार नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्र नियम, वास्तुशास्त्र नियम मराठी, देवघर, देवघर नियम, देवघर स्थापन करण्याचे नियम,