
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो, दिवाळी या सणाची सर्वजण अतुरतेनं वाट पहात असतात. मात्र आता ही अतुरता संपली आहे, दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या सणाला दीपोत्सव असं देखील म्हणतात, कारण या काळात प्रकाशानं तुमचं सर्व घर उजळून निघतं. दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिवे, पणत्या लावण्याची परंपरा आहे, ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं. लक्ष्मीपूजनात देखील दिव्यांना खूप महत्त्व आहे. दिवे लावून लक्ष्मी मातेचं आपल्या घरात स्वागत केलं जातं, अशी मान्यता आहे.वास्तुशास्त्रानुसार असे अनेक छोटे-छोटे उपाय आहेत, जे तुम्ही दिवाळीच्या काळात करू शकतात, ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते, तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात, दिवाळीत दिवा लावताना तो कसा लावावा? त्याची दिशा कोणती असावी? काय काळजी घ्यावी हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
दिवाळीच्या काळात दिवे लावण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. मात्र खूपच थोड्या लोकांना हे माहीत आहे की, दिवा लावताना त्याच्या खाली थोडे तांदळाचे दाने ठेवले जातात, यामागे काही धार्मिक मान्यता आहे. तांदळाला सुख समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. तांदूळ हे लक्ष्मी मातेच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहेत. तांदूळ लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. दिवाळीच्या दिवशी आपण घरातील प्रत्येक कोपर्यामध्ये दिवा लावतो, घर दिव्यांनी उजळून निघतं, मात्र तुम्ही जो दिवा देवापुढे लावता, त्या दिव्याखाली थोडे तांदळाचे दाणे ठेवणं शुभ मानलं जातं. जिथे तुम्ही दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात, तिथे लावण्यात आलेल्या मुख्य दिव्याखाली तांदळाचे दाने ठेवावेत यामुळे, तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, घरात सुख समृद्धी येते, सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे.
दिवा लावताना काय काळजी घ्यावी?
दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण घरातील सर्व दिशांना दिवा लावतो, घर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतं, मात्र दिवा लावताना एक काळजी नेहमी घ्यावी, दिव्याचं तोंड कधीही दक्षिण दिशेला करू नये. इतर कोणत्याही दिशेला दिवा लावला तरी चालतो, खास करून दिव्याचं तोंड हे उत्तर दिशेला असेल तर ते खूपच शुभ मानलं जातं. कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)