बाथरूममध्ये ‘ही’ एक वस्तू ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती होईल मजबूत

वास्तूशास्त्रामध्ये बाथरूमकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु कधीकधी बाथरूम हे तुमच्या आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचे कारण देखील बनू शकते. या लेखात आपण एका सोप्या आणि प्रभावी वास्तू उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये ही एक वस्तू बाथरूममध्ये ठेवल्याने आर्थिक लाभ होतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. चला तर मग कोणती आहे ती वस्तू जाणून घेऊयात.

बाथरूममध्ये ही एक वस्तू ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती होईल मजबूत
bathroom
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 29, 2026 | 7:06 PM

वास्तूशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. लोकं वास्तूनुसार घरातील मुख्य दरवाजा, बेडरूम किंवा स्वयंपाकघर हे योग्य प्रमाणे बांधतात. तसेच त्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे देखील वास्तूनुसार ठरवतात. जेणेकरून त्यांचा चांगला परिणाम कुंटूबातील सदस्यांवर होतो. पण अनेकदा काहीजण बाथरूमकडे दुर्लक्ष करतात. वास्तूशास्त्रानुसार बाथरूमलाही खूप खास मानले जाते. बाथरूम हे घरातील असे ठिकाण आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते अनेक वास्तू दोषांचे केंद्र बनू शकते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर आणि आरोग्यावर होतो.

जर तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आणि तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर एका साध्या आणि प्रभावी बाथरूम वास्तू उपाय आहे. हा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण या उपायाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

बाथरूममध्ये मीठ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार मीठ घरातून नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट काढून टाकते. वास्तुशास्त्रज्ञ बाथरूममध्ये मीठ ठेवण्याची शिफारस करतात. कारण मीठ हे राहू आणि केतूचे स्थान किंवा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते. त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेले मीठ हवेतील आणि सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. ज्यामुळे तुमचे आरोग्य आणि आर्थिकस्थिती चांगली राहण्यास मदत होते.

घरातून नकारात्मकता दूर झाल्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. शिवाय बाथरूम ईशान्य कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजासमोर असल्यास, त्यामुळे एक गंभीर वास्तू दोष निर्माण होतो. मिठाच्या वापरामुळे हा दोष लक्षणीयरीत्या कमी होतो.

काचेच्या वाटीत मीठ ठेवा

बाथरूममध्ये साध्या मिठाऐवजी किंवा टाटा मिठाऐवजी समुद्री मीठ किंवा सैंधव मीठ वापरा. ​​मीठ एका काचेच्या भांड्यात ठेवा. आठवड्यातून एकदा किंवा किमान दर पंधरा दिवसांनी ते बदला. जुने, ऊर्जा शोषून घेणारे मीठ बाथरूमच्या कमोडमध्ये ओतून टाका आणि त्याजागी ताजे मीठ ठेवा. हा सोपा वास्तू उपाय एकदा नक्की करून पहा.

(डिस्क्लेमर:वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us