Hal Shashthi Vrat 2022 : आज हलष्टी व्रत आणि बलराम जयंती, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचे सर्व नियम…

| Updated on: Aug 17, 2022 | 11:18 AM

धार्मिक ग्रंथांमध्ये बलरामजींचे नाव हलधर म्हणूनही आहे. या पवित्र तिथीला हल षष्ठी असे म्हणतात. या दिवशी असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने एखाद्या व्यक्तीच्या मुलाला दीर्घायुष्य मिळते आणि आनंदी जीवन मिळून त्याच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होते

Hal Shashthi Vrat 2022 : आज हलष्टी व्रत आणि बलराम जयंती, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचे सर्व नियम...
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला खास महत्व आहे. आज या पवित्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी किंवा लाली छठ आणि बलराम जयंतीचा पवित्र सण (Festival) म्हणून साजरा केला जातो. षष्ठीचे व्रत मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सुखासाठी व सौभाग्यासाठी ठेवले जाते आणि याचे एक विशेष (Special) महत्व देखील आहे. ही पवित्र तिथी बलरामाची जयंती म्हणून देखील ओळखली जाते. ज्यांना भगवान शेषनागाचा अवतार मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात या आज दिनाचे महत्व (Importance) आणि पूजा करण्याची पध्दत…

मुलाच्या दीर्घायुष्यासाठी ठेवा हे खास व्रत

धार्मिक ग्रंथांमध्ये बलरामजींचे नाव हलधर म्हणूनही आहे. या पवित्र तिथीला हल षष्ठी असे म्हणतात. या दिवशी असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने एखाद्या व्यक्तीच्या मुलाला दीर्घायुष्य मिळते आणि आनंदी जीवन मिळून त्याच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होते. यामुळे या दिवशी हे खास व्रत ठेवले जाते.

हे सुद्धा वाचा

17 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 08:24 पर्यंत शुभ मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आज 17 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 08:17 वाजता सुरू होईल आणि 17 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 08:24 पर्यंत राहील. हिंदू धर्मात उदय तिथीच्या दिवशी सण साजरे करण्याची परंपरा आहे. हळष्टी व्रत किंवा बलराम जयंती आज 17 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाते.

व्रत ठेवल्यानंतर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

या दिवशी गाईचे दूध किंवा तिच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळायला हवे. हलष्टी व्रतामध्ये केवळ म्हशीचे दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ सेवन करायला हवेत. या व्रतामध्ये कोणतेही धान्य किंवा भाजीचे सेवन करणे अजिबातच चालत नाही. आज हलष्टी व्रताला नांगर आणि बैलाचीही विशेष पूजा करावी आणि पशु-पक्ष्यांना चुकूनही त्रास होऊ नये.

(लेखात देण्यात आलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही)