
Ganesh Jayanti vs Ganesh Chaturthi : हिंदू धर्मात गणपतीला प्रथम देवता मानले जाते. गणरायाचे स्मरण केल्याशिवा, त्याची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण मानले जाते. वर्षभर गणेशाची पूजा केली जाते, संकष्टी, अंगारकीला अनेकांचा उपासही असतो. अनेत उत्सव साजरे होतात, त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती. उद्या तर (22 जानेवारी) माघी गणेश जयंती आहे. मात्र गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती याबाबत अनेक लोकांच्या मनात गोंधळ, संभ्रम असतो. या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि पूजा करताना कोणते नियम पाळणे महत्त्वाचे असतं, ते जाणून घेऊया.
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमधील मुख्य फरक
खरंतर या दोन्ही तिथी गणरायाला समर्पित असल्या तरी त्यामागील श्रद्धा आणि मान्यता वेगवेगळ्या आहेत.
गणेश चतुर्थी (भाद्रपद महिना) : गणेश चतुर्थी ही भाद्रपद मिहन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरनुसार ही साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते .पौराणिक कथेनुसार, भगवान गणेश या दिवशी आपल्या भक्तांसोबत राहण्यासाठी पृथ्वीवर येतात. हे गणेशाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते.
गणेश जयंती (माघ महिना) : याला माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला (चौथ्या दिवशी) हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता, म्हणून हा त्यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. भाद्रपदातील गणपती हा ‘पार्थिव’ (मातीचा) असतो, तर माघातील गणपती हा ‘जन्मोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने ‘ विनायक’ रूपात जन्म घेतला होता, असे मानले जाते. दुष्टांचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता अशी मान्यता आहे.
कशी करावी पूजा ?
शुभ वेळ : गणरायाची पूजा करण्यासाठी दुपारची वेळ सगळ्याच चांगली असल्याचे म्हटले आहे.
पूजेचे साहित्य : धूप, दीप, गंध आणि लाल वस्त्राचा पूजेत वापर करा. स्नान करून गणरायासमोर बसावे. पूजेचा संकल्प करावा. पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. शक्य असले तर गणरायाच्या मूर्तीवर अभिषेक करून फूल वहा. गंध लावा,.
मंत्र जप : पूजा करताना ॐ गं गणपतये नम हा जप करावा. शक्य असल्यास श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.
कलश स्थापना : अनेक घरांत या दिवशी कलश स्थापनाही केली जाते, ते पवित्र मानलं जातं.
चंद्र दर्शनापासून सावध
गणेश जयंतीला चंद्रदर्शन (चंद्र पाहणे) निषिद्ध मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटे आरोप किंवा दोषारोप होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला चुकून चंद्र दिसला तर ताबडतोब गणपतीचे नामस्मरण करा. पूजा करा आणि क्षणा मागावी.
विसर्जनाचा नियम
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान अनेक जण दीड, तर राकाही 5, 10 दिवस बाप्पाला घरी आणतात आणि नंतर अनंत चतुर्दशीला,गणरायाचे विसर्जन करतात. मात्र माघी गणेशोत्सवात, गणेश जयंतीच्या दिवशी, बरेच लोक दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळच्या पूजेनंतर तो सोडतात. काही भागात, या दिवशी मूर्तीची स्थापना आणि विसर्जन करण्याची परंपरा देखील पाळली जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)