
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या दिवाळी निमित्त सद्गुरूंनी या दिव्यांच्या सणाचे महत्त्व सांगताना एक विशेष संदेश दिला. त्यांनी लोकांना अंतर्मुख होण्याचे आणि आपल्यातील दिवा प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी लिहिले की, ‘अंधाराचा नाश करणे हा प्रकाशाचा स्वभाव आहे. तुमच्यातील अंतःप्रकाश वृद्धिंगत होवो, हा प्रकाश तुम्हाला आणि तुम्ही स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करो. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत.
दीपावली बद्दल बोलताना सद्गुरूंनी म्हटले की, ‘प्रकाशातच आपण अधिक चांगले पाहू शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला चांगले दिसत नाही तोपर्यंत आपण चालू शकतो का? पळू शकतो का? काही चांगले करू शकतो का? आपल्याला स्पष्टपणे पाहण्याची गरज आहे. स्पष्टपणे पाहणे हे केवळ डोळ्यांनी नव्हे तर मनानेही स्पष्ट पाहायला हवे. जर आपल्याला गोष्टी स्पष्टपणे पाहता येत नसतील तर आपण कुठेच पोहोचणार नाही.’
दीपावलीच्या शास्त्रीय कारणाबद्दल बोलताना सद्गुरू म्हणाले की, ‘ही परंपरा ऋतूंच्या बदलाच्या सखोल अभ्यासातून आलेली आहे. हिवाळ्यात जेव्हा पृथ्वीचा उत्तर भाग सूर्यापासून दूर जातो तेव्हा सूर्यप्रकाश कमी होतो. त्यामुळे या काळात मानसिकच नव्हे तर शारीरिक पातळीवरही एक विशिष्ट नैराश्य येते. त्यामुळे दिवाळीला दिवे लावून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण दिवाळीला विविध प्रकारचे दिवे लावू शकतो, परंतु एरंडेल तेलाचा दिवा लावणे हे फायदेशील ठरते, कारण यामुळे प्रदूषण कमी होते.
Obliteration of darkness is the nature of Light.
May your inner Light grow – to illuminate you and all that you touch.
A Dazzling Diwali to you.Love & Blessings,
Sadhguru pic.twitter.com/KRubFdSDED— Sadhguru (@SadhguruJV) October 20, 2025
भारतीय संस्कृती आणि भारतीय उत्सवांचे महत्त्व अधोरेखित करताना सद्गुरु म्हणाले की, भारतीय संस्कृती अशा संस्कृतीतून येते जी निर्भय, लोभी आणि निर्दोष मानव निर्माण करण्याचा प्रयत्न करते. भीती का निर्माण होते यावर बोलताना सद्गुरु म्हणाले की, ‘आपल्या मनात अनेकदा भीती निर्माण होते कारण एखादी गोष्ट ही प्रथमच घटत असते, त्यामुळे आपल्या मनात साशंकता असते. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीचे त्यांच्या क्षमतांवर चांगले नियंत्रण असते तेव्हा ती निर्भय बनते.
एखादा व्यक्ती स्वतःला सर्वसमावेशक बनवून निर्दोष बनतो. जेव्हा आपण सर्वसमावेशक असतो तेव्हा आपण कधीही काहीही चुकीचे करणार नाही आणि म्हणूनच कोणताही अपराध नाही. जेव्हा आपण स्वतःला अशा प्रकारे समजावतो की आपल्याला फक्त समाधानी वाटेल असं काम करायचं आहे. प्रगती करण्यासाठी दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही तेव्हा आपण लोभमुक्त बनतो.
तुम्ही निर्भय बनला, तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही लोभमुक्त बनतात तर तुम्ही एक परिपूर्ण आणि अद्भुत व्यक्ती बनता. मानवतेचा अर्थ कोणीतरी किंवा सर्व लोक नाही. याचा अर्थ हा (स्वतः) आहे. जर तुम्ही अद्भुत बनला तर बाकी सर्व काही अद्भुत होईल, असं म्हणत सद्गुरुंनी पुन्हा एकदा आपल्या आतील दिवा पेटवण्याचे आवाहन केले आहे.