Maha Kumbh 2025 : पुण्य कमवायचंय? मग विवाहित आणि अविवाहितांनी किती वेळा मारावी महाकुंभात डुबकी

Maha Kumbh 2025 Sangam Snan : महाकुंभात लाखो नाही तर कोट्यवधी भाविकांनी स्नान केले. गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. `13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाला. शाही स्नानच नाही तर सर्वसामान्यांनी पण स्नानासाठी एकच गर्दी केली.

Maha Kumbh 2025 : पुण्य कमवायचंय? मग विवाहित आणि अविवाहितांनी किती वेळा मारावी महाकुंभात डुबकी
| Updated on: Feb 22, 2025 | 4:00 PM

Prayagraj Kumbh Mela Snan : 144 वर्षांनी महाकुंभ आला. या महाकुंभात पुण्य कमवण्यासाठी आणि पाप मुक्त होण्यासाठी कोण गर्दी उसळली. या गर्दीने कोटींचे आकडे कधीच पार केले. साधू-संतच नाही तर सेलेब्रिटी, दिग्गज, राजकीय नेते, सर्व सामान्यांनी तोबा गर्दी केली. गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. पौष पोर्णिमेला 13 जानेवारी, 2025 रोजीपासून महाकुंभाला सुरूवात झाली. आता 26 फेब्रुवारी रोजी, महाशिवरात्रीला अखेरचे स्नान होईल. या कुंभमेळ्यात अनेक परदेशी लोकांनी पण हजेरी लावली. मोक्ष प्राप्तीसाठी जगातील कानाकोपऱ्यातील लोकांचे जत्थे येथे आले. महाकुंभात विवाहित आणि अविवाहित लोकांनी कितीवेळा डुबकी मारावी याविषयीचे खास नियम आहेत.

अगोदर आखाड्यांचे शाही स्नान

महाकुंभाच्या अमृत काळात साधु, संत, नागा साधु, अघोरी आणि इतर साधु स्नान करतात. शाही स्नानमध्ये साधु संताच्या अंघोळी नंतर इतर लोक स्नान करतात. या काळात अंघोळ केल्यास, पुण्य तर मिळतेच पण मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता आहे. संगम स्नानानंतर जल अर्घ्य, फूल आणि दूध चढवले जाते. पण विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी काही नियम आहेत.

किती वेळा मारावी डुबकी?

संगम स्नान करतेवेळी कमीत कमी 5 वेळा डुबकी मारावी अशी मान्यता आहे. याशिवाय अविवाहितांनी संगम स्नानावेळी 7 अथवा 11 वेळा डुबकी मारावी. अनेकदा लोक तीन वेळा डुबकी मारतात. त्याचा अर्थ त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्मरण करून तीन डुबकी माराव्यात. तर पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश यांचे स्मरण करत पाच वेळा डुबकी मारावी.

कुंभ स्नानाला का म्हणतात शाही स्नान?

कुंभ स्नानाविषयी अशी मान्यता आहे की, नागा साधुंना त्यांची धार्मिक निष्ठेमुळे सर्वात अगोदर स्नान करण्याचा अधिकार देण्यात येतो. ते हत्ती, घोडे आणि रथातून राजांप्रमाणे थाटामाटात शाही स्नान करण्यास येतात. या भव्य दिव्यतेमुळेच या स्नानाला कुंभ स्नान, राजसी, अमृत अथवा शाही स्नान म्हणतात. काही जण त्याचा संबंध बादशाह अकबराशी जोडतात, पण त्याविषयी मतमतांतरे आहेत.