आत्म्याचं जागरण हाच खरा प्रकाश… महंत स्वामी महाराजांचा दिवाळीनिमित्त दिव्य संदेश !

परम पूज्य महंत स्वामी महाराजांनी दिवाळी आणि नववर्षाच्या पवित्र प्रसंगी बी.ए.पी.एस. भक्तांना दिव्य आशीर्वाद दिले. जीवनातील प्रत्येक क्षण दिवाळीसारखा असावा, असे सांगत त्यांनी भक्ती, शिस्त आणि सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. अंतरात्म्यातील काळोख मिटवून सद्गुणांचे दिवे प्रज्वलित करणे हीच खरी दिवाळी आहे. त्यांनी कुटुंबात आनंद, शांती आणि प्रेमाचा दिवा तेवत ठेवण्याचा संदेश दिला.

आत्म्याचं जागरण हाच खरा प्रकाश... महंत स्वामी महाराजांचा दिवाळीनिमित्त दिव्य संदेश !
| Updated on: Oct 20, 2025 | 1:14 PM

दिवाळी आणि हिंदू नववर्षाच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर , परम पूज्य महामहंत स्वामी महाराज (स्वामी केशवजीवनदासजी) यांनी जगभरातील बीएपीएस भक्तस संत आणि शुभचिंतकांना दिव्य आशीर्वाद प्रदान केला. त्यांना संदेश हा फक्त उत्सवापुरता मर्यादित नाही तर जीवन उजळवण्याचे आवाहन होते – अंतरात्म्यात जळणारी आणि संपूर्ण समाजाला प्रकाश देणारी अशी दिवाळी

ज्यांना महाराज-स्वामी प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस दिवाळी आहे.” असे त्यांनी म्हटले.

महंत स्वामी महाराज यांनी आपल्या पत्रात लिहीलं

ज्यांना प्रभू आणि स्वामी प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी, जीवनातील प्रत्येक क्षण दिवाळीसारखा असतो. कारण त्यांचे जीवन भक्ती, शिस्त आणि सततच्या अभ्यासाने प्रकाशित होते. जे लोक नियम, शिस्त आणि सेवेत स्थिर असतात तेच खरोखर तेजस्वी जीवन जगतात.” असं त्यांनी नमूद केलं आहे.

“दिवाळी हा केवळ दीप प्रज्वलित करण्याचा सण किंवा ते पर्व तेवढ्यापुरतचं मर्यादित नाही. अंतरात्म्यातील काळोख मिटवून सद्गुणांचे दिवे प्रज्वलित करणे हीच खरी दिवाळी आहे”, असं ते म्हणाले.

महंत स्वामी महाराज म्हणाले, “आध्यात्मिक जीवन म्हणजे दररोज आत्म्याचा प्रकाश तेवत ठेवणे. सेवा, नम्रता आणि सद्गुणाचे दिवे हीच जीवनाची खरी आरती आहे.”

नव्या वर्षाच्या दिल्या शुभेच्छा

नववर्षानिमित्त शुभेच्छाही त्यांनी दिल्या. ते म्हणाले ” “नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात शुभ लाभ आणि प्रगती घेऊन येवो. तुमच्या कुटुंबात आनंद, शांती आणि एकता नांदो आणि तुमच्या सर्व नात्यात प्रेम आणि सौहार्द पसरो.” असा आशीर्वाद त्यांनी दिला.

“प्रत्येक घरात दिव्यासोबत प्रेम, करुणा आणि सेवेचा प्रकाशही पेटवला पाहिजे अशा शब्दांत महंत स्वामी महाराजांनी प्रोत्साहन दिलं. “दिवा थोड्या काळासाठी जळतो, परंतु जेव्हा आत्म्याचा दिवा पेटतो तेव्हा तो जीवनाला कायमचे प्रकाशित करतो.” असेही ते म्हणाले.

महंत स्वामी महाराजांचा आशीर्वाद :

“भगवान स्वामीनारायण आणि गुरु परंपरेचे आशीर्वाद तुमच्या जीवनात नेहमीच शुभ, स्थिरता आणि आनंद घेऊन येवोत. प्रत्येक घरात शांती, सेवा आणि भक्तीचा दिवा तेवत राहो आणि महाराज-स्वामींचा प्रकाश प्रत्येक हृदयात कायम राहो.” असा आशीर्वादही त्यांनी दिला.