
हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केली जातो. या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे कमी होण्यास मदत होते. महाशिवरात्री संपूर्ण वर्षातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरा केली जाते. या दिवशी शिवभक्त मोट्या प्रमाणात महादेवाची पूजा करतात आणि त्याना पाहिजेल असलेल्या गोष्टी मागतात. यंदा 2025 मध्ये 26 फेब्रुवारी रोजी साजरा केली जाणार आहे. या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास मदत होते.
उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्या मते, महाशिवरात्रीला काही वस्तू दान केल्यामुळे महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि भक्तावर अपार आशीर्वादाचा वर्षाव करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या पापांचा नाश होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. या दिवशी दान केल्यामुळे आणि महादेवाच्या कृपेमुळे तुमचे नशिब चमकू शकते. आचार्य पुढे म्हणतात की, दानधर्म केल्यामुळे देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मकता हवी असेव तर तुम्ही महाशिवरात्रीच्याा दिवशी या विशेष गोष्टी दान करा.
कपड्यांचे दान – महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दान केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांना धन आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
पाण्याचे दान – महाशिवरात्रीला महादेवाचे अपार आशीर्वाद मिळविण्यासाठी, या दिवशी पाणी अर्पण करावे. महाशिवरात्रीला पाणी दान केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्ती होते. शास्त्रांमध्ये, पाणी पिण्यास देणे आणि ते दान करणे याला अत्यंत शुभ मानले जाते.
तूप दान – मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप दान केले पाहिजेल. या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. या दिवशी तूपाचे दान केल्यामुळे तुम्हाला ज्ञान आणि निरोगी आरोग्याची प्राप्ती होते.
कच्च्या दुधाचे दान – महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे गाईचे दूध अर्पण केल्याने अनेक फायदे होतात. त्याचबरोबर, या दिवशी दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो. कच्च्या दुधाचे दान केल्याने कुंडलीत चंद्रही मजबूत होतो.
काळ्या तीळाचे दान – महाशिवरात्रीला काळे तीळ दान केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते. पितृदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो. तिथे या दोषाचा परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शास्त्रांनुसार, महाशिवरात्रीला तीळ दान केल्याने शनिदोषही दूर होतो, कारण महादेव शनिदेवाचे गुरु आहेत.