Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला करा काळ्या तीळाचे उपाय, मिळेल सुख समृद्धी

| Updated on: Dec 31, 2023 | 6:26 PM

Makar Sankranti मकर संक्रांती विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही शनिदेवाची राशी आहे. तसेच सूर्य आणि शनि हे शत्रू ग्रह आहेत. यावेळी काही विशेष उपाय केले तर पत्रिकेत सूर्य आणि शनि या दोघांची स्थिती मजबूत होते.

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला करा काळ्या तीळाचे उपाय, मिळेल सुख समृद्धी
मकर संक्रांती
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा एक असा सण आहे ज्याला केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर ज्योतिषशास्त्रातही (Astrology) मकरसंक्रांत खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती सण साजरा केला जातो. ग्रहांचा राजा सूर्य सध्या धनु राशीत भ्रमण करत आहे. 15 जानेवारी 2024 रोजी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करत आहे. अशा प्रकारे, सूर्य वर्षातून 12 वेळा आपली राशी बदलतो, ज्याला संक्रांती म्हणतात. या सर्व संक्रांतांपैकी मकर संक्रांत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवसापासून सूर्याचा प्रवास दक्षिणायनातून उत्तरायणात सुरू होतो.

पिता सूर्याचा पुत्र शनीच्या घरात प्रवेश

मकर संक्रांती विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही शनिदेवाची राशी आहे. तसेच सूर्य आणि शनि हे शत्रू ग्रह आहेत. यावेळी काही विशेष उपाय केले तर पत्रिकेत सूर्य आणि शनि या दोघांची स्थिती मजबूत होते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते.

हे सुद्धा वाचा

मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी करा

  • मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे किंवा पवित्र नदीत स्नान करणे याला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला नदीत स्नान करता येत नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा.
  •  मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यात गंगेच्या पाण्यात किंवा शुद्ध पाण्यात लाल फुले, लाल चंदन, तीळ इत्यादी टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करून ‘ओम घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने कुंडलीतील सूर्य बलवान होतो. तुम्हाला यश आणि चांगले आरोग्य मिळेल.
  •  मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू, लोकरीचे कपडे, घोंगडी आणि खिचडी दान करा. सूर्य आणि शनि दोघेही तुम्हाला यावर आशीर्वाद देतील.
  • तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन करावे. असे केल्याने जीवनात सूर्य आणि शनिदेव या दोघांची कृपा प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)