Astrology : या सवयींमुळे नाराज होते माता लक्ष्मी, करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना

शास्त्रानुसार माता लक्ष्मीला (Mata Lakshmi Puja) धन लक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. काही चुका केल्याने लक्ष्मी नाराजही होते.

Astrology : या सवयींमुळे नाराज होते माता लक्ष्मी, करावा लागतो आर्थिक समस्यांचा सामना
लक्ष्मी उपाय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 6:44 PM

मुंबई : माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. असे म्हणतात की ज्या घरात लक्ष्मी वास करते त्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता नसते. माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. यामुळेच जीवनातील प्रत्येक व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून श्रीमंत व्हायचे असते. जरी असे बरेच लोकं आहेत जे कठोर परिश्रमासह पुष्कळ पूजा-अर्चा करतात, परंतु ते नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे व्यथित आणि अडचणीत राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), एखाद्या व्यक्तीच्या समस्यांचे कारण त्याच्या काही सवयी देखील असू शकतात. माणसाच्या काही सवयी असतात ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून निघून जाते. त्या व्यक्तीच्या त्या सवयींबद्दल जाणून घेऊया.

या कारणांमुळे माता लक्ष्मी होते नाराज

  • आळशी लोकांवर माता लक्ष्मी नेहमी रागावते. असे लोक कधीही यश मिळवत नाहीत आणि नेहमी गरिबीत राहतात. आळसापासून दूर राहिल्यासच देवी लक्ष्मीची प्राप्ती होते.
  • घर अव्यवस्थित ठेवल्याने नशिबाला आमंत्रण मिळते आणि देवी लक्ष्मी रागावते. तसेच पलंगावर पडलेल्या घाणेरड्या व अस्वच्छ चादरी आणि खोलीत पसरलेला कचरा यामुळे दुर्दैवी घटना घडतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या आणि खोलीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
  • जर तुम्ही देखील सूर्यास्तानंतर घर झाडत असाल आणि पुसत असाल तर ही सवय लगेच सोडा. वास्तूशास्त्राच्या दृष्टीने ही अतिशय चुकीची सवय आहे. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात कलह सुरू होतो, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कधीही घर झाडू नका.
  • ताटात उष्टे अन्न कधीही ठेवू नये. याशिवाय कधीही न वापरलेली भांडी जास्त काळ ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सर्व खरकटी भांडी धुवावीत किंवा घराबाहेर ठेवावी.
  • जे लोक यश मिळाल्यावर बढाई मारायला लागतात किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावतात, अशा व्यक्तीची साथ देवी लक्ष्मी लवकर सोडते. त्यामुळे अहंकार टाळा. तसेच, इतरांचा आदर करण्यास विसरू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.