Mangal Gochar 2025: मंगळाचा कर्कराशीत प्रवेश, या ३ राशींच्या लोकांनो सावधान

मंगळाला सर्व ग्रहांचा स्वामी म्हटले जाते. मंगळाचे राशी परिवर्तन करणे ज्योतिष शास्त्रात खूप महत्वपूर्ण मानले गेले आहे. मंगळाने आता कर्क राशीत प्रवेश केला आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन काही राशीच्या लोकांना प्रतिकूल ठरु शकते.

Mangal Gochar 2025: मंगळाचा कर्कराशीत प्रवेश, या ३ राशींच्या लोकांनो सावधान
| Updated on: Apr 04, 2025 | 8:49 PM

Mangal Rashi Parivartan 2025 : ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा स्वामी म्हटले जाते. मंगळ साहस, पराक्रम, ऊर्जा, भूमी, रक्त, युद्ध आणि सैन्यकारक ग्रह म्हटला जातो. ज्योतीष शास्रानुसार मंगळाच्या राशी परिवर्तन केल्याच्या घटनेला खूप महत्व आहे. आता मंगळ मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करीत आहेत. मंगळ आता ६ जूनपर्यंत कर्कराशीत राहणार आहेत. कर्क राशीचे स्वामीत्व चंद्राकडे आहे.

या तीन राशीच्या लोकांनी सावध रहावे

कर्क रास मंगळाची नीच रास म्हटली जाते. कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर मंगळाचा प्रभाव क्षीण होतो. मंगळाचे हे राशीपरिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल रुपाने प्रभावित करु शकते. या राशींच्या लोकांना आरोग्यावर, व्यवसायावर, कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे याराशीच्या लोकांना खुपच सर्तक राहायला हवे. चला तर पाहूयात या राशींबद्दल माहीती…

मेष रास –

मंगळचा प्रवेश मेष राशीच्या चौथे घरात झाला आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना याचा सामना करावा लागू शकतो. घर आणि कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. मानसिक ताणतणाव होऊ शकतात.वाईट संगतीमुळे मान – सन्मानात कमतरता येऊ शकते. या वेळी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून स्वत:ला वाचवावे. तसेच नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.

कर्क रास –

मंगळाचा कर्क राशीत लग्न स्थानात प्रवेश झाला आहे. त्यामुळे या कर्क राशीच्या लोकांनी लोकांशी वाद घालू नये. मुलांच्या बाबतीत काही चिंता होऊ शकते. रक्ताशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. रक्ताची संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. योग-ध्यान आणि व्यायाम करावा. याने अवश्य फायदा होईल.

धनु रास –

मंगळाचा धनु राशीच्या आठव्या स्थानात प्रवेश झाला आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी अडचणीचे ठरु शकते. लव्ह लाईफमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मन एकाग्र करण्यात अडचणी येऊ शकतात. या वेळी वाद-विवाद टाळावा. वाहन चालवताना निष्काळजीपणा करु नका. नियमांचे पालन करावे.

( Disclaimer: ही बातमी ज्योतिष शास्त्राच्यावर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी यास दुजारो देत नाही की अंधश्रद्धा पसरवत नाही. )