Margashirsh 2026 : मार्गशीर्ष महिना केव्हा सुरू होणार? यंदा किती गुरुवार असणार? महालक्ष्मी व्रत कसे करावे? पूजा विधी जाणून घ्या.
दिवाळी संपली आता मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होईल, या महिन्यात महालक्ष्मी व्रत केले जाते. गुरूवारचे उपवास असतात. त्यामुळे कधी सुरू होतोय मार्गशीर्ष? महालक्ष्मी व्रत कसे करावे? गुरुवार किती असणार? याबद्दल जाणून घ्या सविस्तर

दिवाळी संपताच मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात होते.. हा महिना पवित्र मानला जातो. महालक्ष्मी व्रत याच महिन्यात केले जाते. त्यामुळे हा महिना कधी सुरू होणार याची अनेकजण वाट पाहत असतात. याशिवाय भगवान श्रीकृष्णाचीही या महिन्यात उपासना केली जाते. या महिन्यातील प्रत्येक गुरूवार या महालक्ष्मी यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी महालक्ष्मीच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. घरात समृद्धी, संपत्ती आणि शांतता यावी यासाठी महिला घरात घटस्थापना करतात. महालक्ष्मीची पूजा, व्रत आणि कहाणी वाचन करतात. यंदा म्हणजेच 2026 मध्ये 9 डिसेंबर, बुधवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे यंदा महालक्ष्मी व्रतासाठी एकूण 5 गुरुवार येणार आहेत? व्रत कसं करायचं तारखा, पूजा विधी जाणून घ्या…
यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती?
मराठी पंचांगानुसार, 9 डिसेंबर 2026 रोजी मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 10 डिसेंबरपासून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला सुरुवात होणार आहे.
मार्गशीर्ष गुरुवार 2026-27 च्या तारखा
पहिला गुरुवार : 10 डिसेंबर 2026
दुसरा गुरुवार : 17 डिसेंबर 2026
तिसरा गुरुवार : 24 डिसेंबर 2026
चौथा गुरुवार : 31 डिसेंबर 2026
पाचवा गुरुवार : 7 जानेवारी 2027
महालक्ष्मी व्रत कसे करावे?
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे दर गुरुवारी चौरंगावर पूजा मांडून केले जाते. यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावे लागतील. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी. महालक्ष्मी व्रत पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. चौरंगावर गोलाकार तांदूळ पसरून त्यात तांब्याचा कलश ठेवावा.
त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे. कलशाला हळदकुंकू लावावे व त्यात एक नारळ ठेवावा. नारळाभोवती पाच वेगवेगळी झाडांची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. काहीजण त्या नारळाला सजवून देवीच रूप देतात. चौरंगावर एका ठिकाणी पाच फळे ठेवावीत. एकीकडे विड्याची पाने व त्यावर देवीचा शृंगार ठेवावा. त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देखील ठेवून त्याची पूजा करावी. देवीला हळदीकुंकू व्हावे. हार घालावा फुले अर्पण करावीत व फुलांची वेणी देखील घालावी. मग धूप दीप अगरबत्ती लावावी. अशा प्रकारे पूजेची मांडणी केली जाते.
पूजेची मांडणी झाल्यांनतर देवीसमोर हाथ जोडून आपली मनोकामना सांगावी. आपण हे व्रत संपूर्ण संपूर्णाने विश्वास आणि श्रद्धेने करू असे देवीला सांगावे. त्यानंतर देवीच्या मंत्राचा एक माळा जप करावा व महालक्ष्मी व्रत कथा वाचण्यास सुरुवात करावी. मनोभावे कथेचे वाचन करावे. कथा झाल्यानंतर देवीची आरती करावी व नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा.