Masik Durga Ashtami | आज मासिक दुर्गाष्टमी, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि पूजा

| Updated on: Jan 10, 2022 | 6:30 AM

दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते.मासिक दुर्गाष्टमी हा सण देवी दुर्गाला समर्पित करण्यात आला आहे. पौष महिन्यात, 10 जानेवारी 2022 रोजी मासिक दुर्गाष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल.

Masik Durga Ashtami | आज मासिक दुर्गाष्टमी, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि पूजा
Goddess-Durga
Follow us on

मुंबई : दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते.मासिक दुर्गाष्टमी हा सण देवी दुर्गाला समर्पित करण्यात आला आहे. पौष महिन्यात, 10 जानेवारी 2022 रोजी मासिक दुर्गाष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल. चला जाणून घेऊया मासिक दुर्गाष्टमी पूजा-पद्धती, शुभ मुहूर्त.

या दिवशी पुराणानुसार देवी दुर्गेची पूजा केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेची उपासना केल्याने देवी दुर्गेची विशेष कृपा तुमच्यावर होते आणि आयुष्यातील दुःख दूर होतात.

मासिक दुर्गाष्टमी मुहूर्त-
पौष, शुक्ल अष्टमी प्रारंभ – 11:08 AM, 09 जानेवारी
पौष, शुक्ल अष्टमी संपते – दुपारी 12.45 , 10 जानेवारी

पूजा करण्याची पद्धत
या दिवशी सकाळी उठून गरम स्नान करून पूजेच्या ठिकाणी गंगाजल टाकून पवित्र करावे.
घरातील मंदिरात दिवा लावावा.
देवी दुर्गेचा गंगाजलाने अभिषेक करा.
देवीली अक्षत, सिंदूर आणि लाल फुले अर्पण करा.
धूप आणि दिवे लावून दुर्गा चालिसा पाठ करा आणि नंतर आरती करा.

देवी पूजेत या गोष्टी लक्षात ठेवा

? 2 ते 10 वर्षांच्या मुलींना कन्या पूजेत आमंत्रित करा. पूजेपूर्वी घरात स्वच्छता असावी हे लक्षात ठेवा.

? दोन वर्षांच्या मुलीची पूजा केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

? 3 वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते. त्रिमूर्तीची पूजा केल्याने घरात धन आणि अन्न येते.

? चार वर्षांची मुलगी कल्याणी मानली जाते.

? पाच वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात. त्यांची पूजा केल्याने रोग आणि दुःख दूर होतात.

? सहा वर्षांच्या मुलीला कालिका रुप म्हणतात. कालिका रुपातून ज्ञान आणि विजय प्राप्त होतो.
सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा

तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की