AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Masik Shivratri 2023 : आज मासिक शिवरात्री, या सोप्या उपायाने होईल शत्रूचा नाश

मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि गौरी मातेची पूजा केल्याने त्यांचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. मासिक शिवरात्रीचे व्रत हे शत्रूंचा नाश करणारे आहे.

Masik Shivratri 2023 : आज मासिक शिवरात्री, या सोप्या उपायाने होईल शत्रूचा नाश
मासिक शिवरात्री व्रतImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 16, 2023 | 9:43 AM
Share

मुंबई : दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्रीचे व्रत (Shivratri Vrat) आज, शुक्रवार, 16 जून 2023 रोजी पाळण्यात येणार आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि गौरी मातेची पूजा केल्याने त्यांचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. मासिक शिवरात्रीचे व्रत हे शत्रूंचा नाश करणारे, अखंड सौभाग्य देणारे आणि योग्य वर देणारे आहे. म्हणूनच लोकं मासिक शिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करतात, अभिषेक करतात आणि उपाय करतात.

आषाढ मासिक शिवरात्री 2023 शुभ मुहूर्त

मराठी दिनदर्शिकेनुसार, जेष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारीख 16 जून 2023 शुक्रवारी सकाळी 08.39 पासून सुरू होईल आणि 17 जून 2023 रोजी शनिवारी सकाळी 09.11 वाजता समाप्त होईल. प्रदोष काळात मासिक शिवरात्रीची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आषाढ मासिक शिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा असल्याने मासिक शिवरात्रीची तारीख 16 जून मानली जाईल. यासोबतच मासिक शिवरात्रीला धृती नावाचा शुभ योगही तयार होत आहे.

  • मासिक शिवरात्रीला भोलेनाथाच्या पूजेची वेळ – 16-17 जूनच्या मध्यरात्री 12:02 ते 12:42 पर्यंत.
  • प्रदोष काल – 16 जूनच्या संध्याकाळी 05:36 ते 07:21 पर्यंत असेल.
  • धृती योग – 16 जून 2023 च्या पहाटे 02:03 ते 16-17 जून 2023 च्या मध्यरात्री 01:23 पर्यंत राहील. भूमीपूजा, पायाभरणी आणि नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी धृती योग शुभ मानला जातो.

मासिक शिवरात्री उपाय

शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रत्येक कार्यात यश मिळविण्यासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी मासिक शिवरात्रीचा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी मासिक शिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान शिवाच्या ‘ओम शन शन शिवाय शन शन कुरु कुरु ओम’ या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या शत्रूंचा लवकरच पराभव होईल. यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू लागेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!