
Mauni Amavasya 2026: सध्या सनातन धर्मात प्रत्येक अमावस्येला स्नान, दान आणि पितृपूजेला विशेष महत्त्व आहे. मात्र, माघ महिन्यात येणारी अमावस्या अधिक पुण्यदायी मानली जाते आणि तिलाच मौनी अमावस्या असे म्हणतात. आज देशभरात मौनी अमावस्येचा पवित्र महापर्व भक्तिभावाने साजरा केला जात आहे.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले स्नान, दान, जप-तप आणि मौनव्रत खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, काही नियमांचे उल्लंघन झाल्यास पुण्याऐवजी दोष लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आजच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे उशिरा उठणे किंवा दिवसा झोप घेणे टाळावे. स्नान न करता राहू नये. घाणेरडे किंवा आधी वापरलेले कपडे परिधान करू नयेत.

काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. कारण हा रंग नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. या दिवशी पितरांना दोष देणे किंवा त्यांची निंदा करणे टाळावे. अन्यथा पितृदोष लागू शकतो.

दान करताना अहंकार दाखवू नये. केस कापणे किंवा नखे कापू नये. फार काळ बंद असलेल्या किंवा कायम अंधार असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. वाद-विवाद पूर्णपणे टाळावेत.

या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. कोणी मदतीसाठी आले आणि मदत करता आली नाही तर नम्रपणे क्षमा मागावी. अपमान करू नये. Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही.