महाभारतातील ‘त्या’ 5 शक्तीशाली महिला, ज्यांचा शब्द बडे बडे योद्धे टाळू शकले नाही, श्रीकृष्णालाही मानावी लागली हार

Mahabharat : महाभारतातील महान महिला योद्धांबद्दल बोलायचं झालं तर, सर्वात पहिलं नाव द्रौपती यांचं नाव समोर येतं... कौरवांनी द्रौपदीचा अपमान केल्यानंतर महाभारत युद्ध सुरू झालं... आजही 'महाभारत' जाणून घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे... आज जाणून घेऊ महाभारतातील शक्तिशाली महिलांबद्दल...

महाभारतातील 'त्या' 5 शक्तीशाली महिला, ज्यांचा शब्द बडे बडे योद्धे टाळू शकले नाही, श्रीकृष्णालाही मानावी लागली हार
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 12:48 PM

महाभारतातील प्रत्येक पात्राची स्वतःची वेगळी कथा आहे. महाभारतातील प्रत्येकाचं जीवनात अनेक रहस्य आहेत. आजही महाभारत समजून घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. महाभारतातील अनेकांचे पूर्वजन्माशी संबंध असल्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात संघर्षांचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर महाभारतातील काही पात्रांचे आयुष्यही शापित होते, ज्यामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घेऊन महाभारताच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावावी लागली होती.

महाभारतातील महिलांकडे देखील दैवी शक्ती होती. ज्यामुळे त्यांच्यापुढे योद्धे देखील काहीही करु शकले नाहीत. अखेर त्यांना माघार घ्यावी लगली होती. आज आम्ही तुम्हाला महाभारतातील अशा शक्तीशाली महिलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा शब्द बडे बडे योद्धे टाळू शकले नाही, श्रीकृष्णालाही मानावी लागली हार…

गांधारी​ | गांधारी धृतराष्ट्र यांच्या पत्नी होत्या. धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळे होते. या कारणास्तव त्यांची पत्नी गांधारी यांनी देखील डोळ्यावर पट्टी बांधली, परंतु गांधारी यांनी धृतराष्ट्रा यांनी पत्नी म्हणून राज्याचा ताबा घेतला. गांधारी यांचे म्हणणेही कोणी टाळले नाही. महाभारताच्या युद्धात गांधारी यांनी दुर्योधनाला त्यांच्याकडे नग्नावस्थेत येण्यास सांगितलं. होतं. कारण त्यांना दुर्योधन यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचे शरीर वज्राचे बणवायचे होते…

हे सुद्धा वाचा

द्रौपदी​ | राज्यसभेत द्रौपदी याचा अपमान झाल्यामुळे महाभारत युद्ध झालं. द्रौपदी पाच पांडवांच्या पत्नी होत्या… पाचही पांडव द्रौपदीवर प्रेम आणि त्यांचा आदर करायचे. अर्जुन, भीम आणि युधिष्ठिर यांनी द्रौपदीच्या शब्दांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. युद्ध सुरु असताना द्रौपदी यांना दिलेलं वचन पूर्ण करत भीम यांनी दुशासनाचा वध केला आणि त्यांच्या रक्ताने द्रौपदीचे केस धुतले.

​राणी सत्यवती​ | महाभारतातील राणी सत्यवती यांचे व्यक्तिमत्त्वही खूप प्रभावी होते. राणी सत्यवती यांचा शब्दही कोणी टाळला नाही. सत्यवती यांच्या सांगण्यावरूनच महर्षी व्यासांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला, त्यानंतर पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर यांचा जन्म झाला. भीष्म पितामहांनी देखील राणी सत्यवती यांचे म्हणणे कधी टाळले नाही. राणी सत्यवती भीष्म यांची सावत्र आई होती. भीष्म पितामहा यांनी देखील राणी सत्यवती यांची प्रत्येक गोष्ट ऐकली…

कुंती​ | कुंती पाच पांडवांच्या आई होत्या… पाचही पांडव कधीच आई शब्द खाली पडू देत नव्हते. अर्जुन यांनी स्वयंवर जिंकून द्रौपदी यांच्यासोबत लग्न केलं. घरी आल्यानंतर कुंती यांनी जी कोणती गोष्ट आणली आहे, ती पाच पांडवांमध्ये वाटून घ्या… असे आदेश दिले. अखेर पाचही पांडवांनी द्रौपती यांच्यासोबत लग्न केलं आणि आईचा शब्द पूर्ण केला.

सुभद्रा | सुभद्रा श्रीकृष्ण यांच्या बहीण होत्या.. सुभद्रा यांचं प्रेम अर्जुन यांच्यावर होतं. पण अर्जुन यांचा विवाह द्रौपदी यांच्यासोबत झाल्यामुळे त्यांनी सुभद्र यांच्यासोबत विवाह करण्यास नकार दिला. अशात सुभद्रा यांनी अर्जुन यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा सोडली नाही. त्यांनी भाऊ कृष्ण यांच्याकडे हट्ट केला. त्यामुळे बहिणीचा हट्ट श्रीकृष्ण यांना मानावा लागला. अखेर सुभद्रा आणि अर्जुन यांचा विवाह झाला. अभिमन्यू सुभद्रा आणि अर्जुन याचं पूत्र होते.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.