अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात फूट, ऐश्वर्या हिचं जया बच्चन यांच्याकडे दुर्लक्ष? मोठं कारण समोर

Aishwarya Rai Bachchan | गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा... आता जया बच्चन - ऐश्वर्या राय यांच्यातील वाद चव्हाट्यावर, अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात पडतेय फूट? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बच्चन कुटुंबाची चर्चा...

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात फूट, ऐश्वर्या हिचं जया बच्चन यांच्याकडे दुर्लक्ष? मोठं कारण समोर
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 11:32 AM

बच्चन कुटुंब बॉलिवूड विश्वातील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांना जाणून घ्यायची असते. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात वाद सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना, पुन्हा ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं आहे. नुकताच जया बच्चन यांचा वाढदिवस झाला. पण ऐश्वर्या हिने जया बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नसल्याची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यात काही ठिक नाही… जया – ऐश्वर्या एकमेकींसोबत बोलत देखील नाहीत… अशी देखील चर्चा आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघींपैकी एकीने देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, जया बच्चन यांच्या वाढदिवशी ऐश्वर्या हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या नाहीत, म्हणून पुन्हा ऐश्वर्या – जया यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

जया यांच्यासोबत असलेल्या मतभेदांचा परिणाम पती – पत्नीच्या नात्यावर होत असल्याची देखील चर्चा रंगली आहे. ‘द आर्चीज’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान देखील दोघी एकमेकींकडे दुर्लक्ष करताना दिसल्या… तेव्हा बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी दिल्या जया बच्चन यांना शुभेच्छा…

महानायक मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या भावना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बिग बी यांनी ब्लॉगमध्ये भावना व्यक्त करत पत्नी जया बच्चन यांना वाढदिसाच्या शुभेच्छा दिल्या.

‘ही एका कुटुंबाच्या जन्मदिवसाची सकाळ आहे… ज्यासाठी कोणत्या स्पष्टीकरणाची गरज नाही… बेटर हॉफ आज तुमचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा…’ अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात.

अभिषेक बच्चन याने देखील आई जया बच्चन यांचा अनसीन फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आईचा खास फोटो पोस्ट करत अभिषेक बच्चन याने कॅप्शनमध्ये, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई… लव्ह यू…’ असं लिहिलं आहे. अभिषेक याने पोस्ट केलेल्या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाहीतर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत जया बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या… सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.