
श्रावण हा महिना भोलेनाथांना खूप प्रिय आहे, त्यामुळे या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते. असं म्हणतात की, भगवान शिव जेव्हा कोणावर प्रसन्न होतात, तेव्हा ते काही ना काही संकेत देतात. श्रावणात अनेकांच्या स्वप्नात नाग-नागिणीची जोडी दिसते, तर काहींना घराच्या आजूबाजूला नाग-नागिणीची जोडी दिसते.
नाग-नागिणीची जोडी दिसण्याचा अर्थ काय?
असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात नाग-नागिणीची जोडी पाहणं हे सुख-समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. श्रावणात नाग-नागिणीची जोडी पाहणं म्हणजे घरात शुभ क्षणांचं आगमन होणार आहे. हे धन, समृद्धी आणि सुख-शांतीचंही संकेत असू शकतं.
वाचा: 24 वर्षांनी येणार हा राज योग, मालामाल होणार या 5 राशींचे लोक
स्वप्नात नाग-नागिणीची जोडी पाहणं
धार्मिक मान्यतांनुसार, स्वप्नात नाग-नागिणीची जोडी पाहणं हे शुभ संकेत मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार, हे जीवनातील सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. स्वप्नात नाग-नागिणीची जोडी पाहण्याचा अर्थ असा आहे की, लवकरच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. स्वप्नात नाग-नागिणीची जोडी पाहणं हे वैवाहिक जीवन आणि धन-संपत्तीच्या बाबतीत अत्यंत शुभ मानलं जातं.
प्रत्यक्षात सापाची जोडी पाहणं
जर तुम्हाला श्रावण महिन्यात घरात किंवा इतर कुठेही सापाची जोडी दिसली, तर ती देखील शुभ मानली जाते. घरात सापाची जोडी पाहणं हे कुटुंबातील सदस्यांसाठी प्रगती आणि जीवनातील दुखांपासून मुक्तीचं संकेत असू शकतं. जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल आणि तिथे सापाची जोडी दिसली, तर हा त्या जमिनीच्या खरेदीसाठी शुभ संकेत आहे आणि तिथे धनप्राप्तीची शक्यताही असू शकते.
स्वप्नात पांढऱ्या नाग-नागिणीची जोडी पाहण्याचा अर्थ
श्रावणात स्वप्नात पांढऱ्या नागाला पाहणं हे शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, भगवान शिव प्रसन्न झाल्यावर स्वप्नात पांढरे नाग दिसतात. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पांढऱ्या नाग-नागिणीची जोडी पाहिल्याने नशीब उजळतं. हे स्वप्न येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल, धनलाभ आणि यशाचं संकेत देतं.
स्वप्नात नाग आणि नागिणीचं मिलन पाहण्याचा अर्थ
स्वप्नात नाग-नागिणीचं मिलन पाहणं हे सामान्यतः शुभ मानलं जातं, विशेषतः जर ही जोडी एकत्र आनंदाने भेटताना दिसली. हे स्वप्न धन, समृद्धी आणि सुख-शांतीचं संकेत असू शकतं. काही मान्यतांनुसार, हे स्वप्न जीवनातील भाग्य आणि यशाचंही प्रतीक आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)