
हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मामध्ये नरसिंह द्वादशीच्या व्रताला विशेष महत्त्वं दिले जाते. नरसिंहाचे व्रत भगवान विष्णूचा आवतार नरसिंह या आवताराला समर्पित आहे. नरसिंह द्वादशीचे व्रत होळीच्या तीन दिवस आधी साजरे केले जाते. होळीच्या दोन ते तीन दिवस आधी नरसिंहाचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी येते. तुमच्या कुंटुंबामध्ये मतभेद किंवा भाडणं होत असतील तर तुम्ही नरसिंह द्वादशीचे व्रत करू शकता. नरसिंह द्वादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. नरसिंह द्वादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.
तुम्ही नरसिंह द्वादशीचे व्रत केले तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यास मदत होते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक फायदे होतात. वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 10 मार्च रोजी सकाळी 7:48 वाजता सुरू होईल. 11 मार्च रोजी संध्याकाळी 8:16 वाजता द्वादशी तिथी संपेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीच्या मान्यतेनुसार, 11 मार्च रोजी नरसिंह द्वादशीचे व्रत ठेवणे शुभ मानले जाईल. या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया.
असे मानले जाते की जर कोणी नरसिंह द्वादशीला उपवास केला तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद भक्तावर राहतो. उपवास केल्याने माणसाची पापे धुऊन जातात आणि भीती नष्ट होते. नरसिंह द्वादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो. असे मानले जाते की भगवान नरसिंह स्वतः व्रत करणाऱ्या भक्ताचे रक्षण करतात, जसे त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले होते. भगवान नरसिंहाची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि शत्रूंचा नाश होतो. या दिवशी तुमच्या घरामध्ये पूजा करून तूपाचा दिवा लावा. तुमच्या घराचा मुख्य द्वार स्वच्छ करून उंबऱ्यावर हळदीचे पाणी शिंपडा. हळदीला हिंदू धर्मामध्ये भरपूर महत्त्चाचे मानले जाते. हळदीला सुख शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.
नृसिंह द्वादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ पिवळे कपडे घाला. घरातील पूजास्थळ स्वच्छ करा आणि भगवान नरसिंहांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि विधीनुसार पूजा सुरू करा. पूजा करताना देवाला फुले, फळे, मिठाई आणि पंचामृत इत्यादी अर्पण करा. नंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करा आणि देवाची पूर्ण भक्ती करा. यानंतर, विष्णू सहस्रनाम, नरसिंह स्तोत्र आणि भगवान विष्णूची आरती पठण करून पूजा पूर्ण करा. देवाला अर्पण केलेले दान कुटुंबात वाटून घ्या.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)