Holi 2025: होळीला गजकेसरी राज योग, ‘या’ राशींचे नशीब चमकेल, मिळणार अपार धन अन् पैसा
होळीच्या दिवशी, गुरु आणि मनाचा कारक चंद्र यांच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग हा एक शक्तिशाली योग मानला जातो. या राजयोगामुळे काही राशींचे नशीब बदलू शकते. तसेच या राशींच्या लोकांना इंक्रीमेंट आणि प्रमोशनचे योग निर्माण होऊ शकतात. त्याराशींबद्दल जाणून घेऊया.

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रंगपंचमी हा सण 14 मार्च रोजी साजरा केली जाणार आहे. यावर्षी होळीचा सण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास मानला जात आहे. कारण या दिवशी रंगपंचमीला गजकेशरी राजयोग निर्माण होत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी रंगपंचमीच्या दिवशी गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. कारण रंगपंचमीच्या दिवशी गुरु आणि चंद्रच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतो. यावेळी होळीला चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच गुरु आधीपासूनच वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत वृषभ राशीत या दोघांचा संयोग होईल आणि गजकेसरी राजयोग तयार होईल. या गजकेसरी राजयोगामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते आणि त्यांना प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप शुभ ठरू शकतो. हा राजयोग मिथुन राशीच्या बाराव्या बाराव्या स्थानी निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळी मिथुन राशीचे लोकं पैश्यांची सेव्हिंग करू शकतात. तसेच नवीन कार्याची सुरूवात होऊ शकते. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग सिंह राशीच्या दहाव्या स्थानावर निर्माण होत आहे. यावेळी सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या योजनेवर काम करू शकता. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप अनुकूल ठरू शकतो. हा राजयोग मकर राशीच्या पाचव्या स्थानावर निर्माण होत आहे. यावेळी सिंह राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा उत्तम राहील. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
