AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri Foods: नवरात्रीच्या दिवसात आहारात या घटकांचा करा समावेश, नाही भासणार प्रोटीनची कमतरता

नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे उपवासाला महत्त्व आहे तसेच या काळात आरोग्य जपणे देखील महत्त्वाचे आहे. उपवासाच्या पदार्थात प्रोटीन कमी असल्याने त्याची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे.

Navratri Foods: नवरात्रीच्या दिवसात आहारात या घटकांचा करा समावेश, नाही भासणार प्रोटीनची कमतरता
नवरात्री उपवास Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 25, 2022 | 8:27 PM
Share

मुंबई, उद्यापासून देशभरात नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरवात होत आहे.  या नऊ दिवसांच्या अनेक भाविक उपवास करतात. तसेच मांसाहार आणि तामसी पदार्थ वर्ज्य करतात. दुसरीकडे, जर कोणी वजन कमी करणारा आहार घेत असेल तर नवरात्रीचा उपवास (Navratri Fasting) त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो कारण या काळात त्यांना प्रोटीनयुक्त पदार्थांची (Protein Food)  कमतरता भासते. प्रथिनांची कमतरता त्यांना प्रथिनांच्या अगदी कमी स्रोतातून भागवावी लागेल. जर तुम्हीही वजन कमी करणाऱ्या डाएटवर असाल तर आपण काही प्रोटीनयुक्त घटकांबद्दल जाणून घेणार आहोत  जे नवरात्रीमध्ये खाल्ल्याने प्रोटीनची कमतरता पूर्ण होईल.

1. दुग्धजन्य पदार्थ

दूध हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. नवरात्रीच्या काळात तुम्ही कोणत्याही दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करू शकता, ज्यामुळे प्रोटीनची कमतरता पूर्ण होऊ शकते. दही आणि चीजपासून बनवलेल्या गोष्टींमध्येही प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. दुसरीकडे, जर तुमचा उपवास असेल तर या गोष्टी देखील उत्साही राहण्यास मदत करू शकतात.

2. चीज

जर तुम्ही पनीरचे शौकीन असाल तर नवरात्रीला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही पनीरपासून बनविलेले विविध प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पनीर भुर्जी खाऊ शकता किंवा कच्चे पनीरही खाऊ शकता.

3. सुका मेवा

बदाम आणि अक्रोड सारखे सुका मेवा देखील प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही याचे सेवन करू शकता, यामुळे भूक देखील भागेल आणि प्रोटीनची कमतरता देखील पूर्ण होईल. तुम्ही भोपळ्याच्या बिया किंवा फ्लेक्ससीड देखील खाऊ शकता.

4. सातूचे पीठ

सातूचे पीठ देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पिठाची खीर देखील बनवू  शकता, तसेच गव्हाची पोळ्यामध्ये देखील प्रोटीनचे प्रमाण अधिक असते.

5. प्रोटीन शेक

हायड्रेटेड राहण्यासाठी प्रोटीन शेकचे सेवन करा. प्रोटीन शेक हा देखील शाकाहारी प्रथिनांचा स्रोत आहे. इच्छा असल्यास आपण त्यात फळे आणि काजू घालू शकता. याशिवाय लस्सी किंवा ताकही घेता येते.

6. मेव्याचे लाडू

सणासुदीच्या काळात प्रथिनयुक्त मेव्याचे लाडूही खाऊ शकतात. लाडूंमध्ये तूप, बदाम, राजगिरा टाका, त्यामुळे त्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढेल. लाडू बनवायला खूप सोपे आहे, त्यामुळे या नवरात्रीत घरी करून बघा.

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?