Astro Tips: ‘या’ गोष्टी सूर्यास्तानंतर कधी दान करू नका, नाहीतर होवू शकतं आर्थिक नुकसान

सूर्यास्तानंतर यावस्तूंचे दान करणं अशुभ असतं. त्याने जीवनात नकारात्मकता येते.

Astro Tips: 'या' गोष्टी सूर्यास्तानंतर कधी दान करू नका, नाहीतर होवू शकतं आर्थिक नुकसान
सूर्योस्ता नंतर यावस्तू दान करू नका
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 04, 2022 | 3:52 PM

Astro Tips:हिंदू धर्मात (Hindu Dharma) दान-पुण्याचे विशेष महत्व आहे. दान केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. पण काही गोष्टी सूर्योदया नंतर दान करू नये. जाणून घ्या कोणत्या आहेत यागोष्टी

हिंदू धर्मात दानाला विशेष महत्व आहे. असं मानलं की दान केल्याने सुख समृद्धी घरी येते. दान करण्याला मुक्तिचा मार्ग सांगितला गेला आहे. याचमुळे लोक काही विशिष्ट दिनी दान करतात. आपल्या कमाईतून गरजूनां दान केल्याने पुण्य लाभते. शास्रात (Astro Tips) दान करण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. यानियमाचं पालन करून दान केलं पाहिजे. असं केल्याने फल प्राप्ती होते. यानियमानुसार काही ठराविक वस्तू ठराविक वेळी दान करणं चूकीचं सांगितलं गेलं आहे. सूर्यास्तानंतर यावस्तूंचे दान करणं अशुभ असतं. त्याने जीवनात नकारात्मकता येते. जाणून घेऊया सूर्योस्ता नंतर (Sunset) कोणत्या गोष्टी दान करू नयेत.

तुळशीचे रोप –

सूर्यास्ता नंतर तुळशीचे रोप दान करू नये. सूर्योस्तानंतर तुळशीला स्पर्श करणं चुकीचं मानलं जातं. संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये. संध्याकाळी तुळशीचे रोप दान केल्याने विष्णु देव नाराज होतात. त्याने जीवनात नकारात्मकता येते.

पैश्यांचे दान –

सूर्योस्तानंतर कोणाला पैसे देऊ नये. त्याने लक्ष्मी देवी कोपते. संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन घरात होत असते. यावेळी धन दान केल्याने तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाल कोणाला पैश्यांचे दान करायचे असतील तर ते सकाळी करावे.

हळदीचे दान करू नका –

हिंदू धर्मात अनेक शुभ कार्यात हळद वापरली जाते. हळदीच्या पिवळ्या रंगाचा बृहस्पती ग्रहाशी संबंध असतो. हळदच्या वापराने अनेक ग्रहीय समस्या सोडवता येतात. सूर्यास्तानंतर कोणाला हळद देवू नये. असं केल्याने बृहस्पति ग्रह कमजोर होतो. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

दुधाचे दान करू नये –

शास्त्रात दुधाचं दान करणं खूप फलदायी मानलं जातं. त्याला चंद्रचा कारक मानलं जातं. तुम्ही सोमवार आणि शुक्रवारी दुधाचे दान करू शकाता. पण सूर्यास्तानंतर दुधाचे दान करू नये. त्याने लक्ष्मी देवी आणि विष्णु देव नाराज होतात. त्याने आर्थिक तंगीला तोंड द्यावे लागते.

दह्याचे दान करू नये –

दह्याचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. शुक्र ग्रह सुख समृद्धीत वृद्धी आणतात. सूर्योस्तानंतर याचं दान करणं अशुभ मानलं जातं. त्याने शुक्र नाराज होऊ शकतात. सुख समृद्धी कमी होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी कोणाला दही दान करू नये.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें