वास्तूशास्त्रानुसार तुमची पर्स कधीही रिकामी ठेऊ नका, अन्यथा येऊ शकते दारिद्रय

वास्तुशास्त्रानुसार रिकामी पर्स गरिबी आणू शकते. संपत्ती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी नेहमी तुमच्या पर्समध्ये किमान एक नाणे ठेवावे. रिकामी पर्स असल्यास आर्थिक चणचण जाणवू शकते. चला तर आजच्या लेखात पर्स रिकामी असल्यास कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात ते जाणून घेऊयात.

वास्तूशास्त्रानुसार तुमची पर्स कधीही रिकामी ठेऊ नका, अन्यथा येऊ शकते दारिद्रय
वास्तूशास्त्र
| Edited By: | Updated on: Nov 20, 2025 | 5:58 PM

आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात UPI आल्यापासून लोकं त्यांच्या पर्स मध्ये पैसे ठेवणं जवळ जवळ बंदच केल आहे. कारण आजकाल सहज ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवता येतात. पण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पर्स मध्ये एकही रूपया किंवा थोडेसे ही पैसे नसल्यास लक्ष्मी देवीचा अपमान होऊ शकतो आणि तुमच्या घरात किंवा आयुष्यात गरिबी येऊ शकते. तर आजच्या लेखात आपण रिकामी पर्स जवळ बाळगल्यास तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊयात.

खरं तर, आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे. पैशाची कमतरता माणसाला कमकुवत करू शकते. वास्तुशास्त्रात रिकामे पाकीट ठेवणे खूप अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की रिकामे पाकीट गरिबी आणते. पाकीटात नेहमी कमीत कमी एक रुपयाचे नाणे तरी ठेवावे. असे मानले जाते की ही चूक तुमच्या आयुष्यातील समृद्धी हिरावून घेते म्हणून तुम्ही पर्स किंवा पाकीट रिकामे ठेवण्याची चूक टाळावी. जर तुम्हाला तुमचे पाकीट रिकामे हवे असेल तर नेहमी लाल कापडात गुंडाळलेले एक तरी नाणे त्यात ठेवा. यामुळे समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. शिवाय वास्तुशास्त्रानुसार जुने पाकीट फेकून देतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जुने पाकीट कधीही रिकामे फेकू नये. त्यात नेहमी थोडे तांदूळ ठेवा आणि नंतर तेच तांदूळ तुमच्या नवीन पाकीटात ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते.

रिकामी पर्स भेट देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्याकडे नाणी नसतील तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये काही तांदळाचे दाणे ठेवू शकता. यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही. तांदुळ हे देवी लक्ष्मीचे आवडते आहेत. त्याच वेळी लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की पर्स भेट देणे वाईट आहे का, कारण त्यामुळे त्यांच्या घरातील संपत्ती दुसऱ्याला हस्तांतरित होईल. असे म्हटले जाते की असे अजिबात नाही. तथापि कधीही रिकामी पर्स भेट देऊ नये. त्यात नेहमी काही पैसे ठेवावेत, कारण यामुळे समृद्धी येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)