श्रावणात महादेवाला चुकूनही अर्पण करु नका या वस्तू, अन्यथा सुरु होतील वाईट दिवस

श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. अशातच श्रावणात महादेवाची पूजा करताना कधीच या वस्तू अर्पण करू नये, अन्यथा तुम्हाला अनेक संकटाचा सामना कराव लागू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण महादेवाला कोणत्या वस्तु अर्पण करू नये ते जाणून घेऊयात.

श्रावणात महादेवाला चुकूनही अर्पण करु नका या वस्तू, अन्यथा सुरु होतील वाईट दिवस
shravan
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 4:24 PM

देवांचे देव महादेव यांचे वैभव अद्वितीय आहे. केवळ जलाभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यासोबतच जीवनात आनंद येतो. श्रावण महिन्यात भक्त भगवान शिवाची विशेष पूजा करतात. कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होत आहे. भगवान शिवाचे भक्त श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करतात, शिवलिंगाचा अभिषेक करतात आणि भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करतात

परंतु बऱ्याच वेळा भक्तीमध्ये आपण नकळत शिवलिंगावर असे काही साहित्य अर्पण करतो, जे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते. म्हणूनच, भगवान शिवाला काय अर्पण करणे शुभ आहे आणि काय अर्पण करणे टाळावे हे आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

शिवलिंगावर काय अर्पण करू नये?

शिवलिंगावर अर्पण करण्यास शास्त्रात काही गोष्टी निषिद्ध आहेत. खऱ्या भक्तीमध्ये आपण या गोष्टी लक्षात ठेवणे आणि पूजेचे पावित्र्य राखणे महत्वाचे आहे

केतकीची फुले

पुराणानुसार एकदा केतकीने भगवान शिव यांना खोटे सांगितले. तेव्हापासून हे फूल शिवलिंगावर अर्पण केले जात नाही. पूजेदरम्यान शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करू नका.

तुळशीची पाने

तुळशीमाता भगवान विष्णूंना प्रिय आहे, भगवान शिवाच्या पूजेमध्ये तिचा वापर करण्यास मनाई आहे. म्हणून, श्रावणात महादेवाला तुळशीचे पान अर्पण करू नका.

अर्धवट तुटलेली किंवा वाळलेली बेलची पाने

शिवाला ताजी स्वच्छ आणि तीन पानांची बेलाचे पान खूप आवडतात. तुटलेली किंवा कोरडी पाने अर्पण करणे अशुभ मानले जाते.

लाल रंगाची फुले आणि चमेली

ही फुले दैवी शक्तींना अर्पण केली जातात. भगवान शिव यांना शांत आणि सात्विक रंगांची फुले आवडतात.

तीव्र सुगंध असलेली फुले

भगवान शकंर यांना खूप तीव्र सुगंध असलेली फुले आवडत नाहीत. त्यांच्या शांत, सात्विक आणि साध्या स्वभावासाठी अशी फुले योग्य मानली जात नाहीत. म्हणून केवडा, जुही, कदंब, बहेडा, वैजयंती, चंपा आणि केतकी ही फुले शिवपूजेत निषिद्ध मानली जातात.

शंखापासून पाणी अर्पण करणे

समुद्रमंथनातून मिळालेला हा शंख भगवान विष्णूंना समर्पित होता. म्हणून शिवलिंगावर शंखाचे पाणी अर्पण करू नये.

शास्त्रांनुसार, शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने पूजेची शुद्धता बिघडते आणि ते भगवान शिवाच्या आवडीनुसार नाहीये. श्रावण महिन्यात शिवभक्तीमध्ये साधेपणा आणि पवित्रता सर्वोच्च आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)