घरात या 7 ठिकाणी चुकनही तुळस लावू नका, अनेक समस्यांना घेरलं जाईल घर

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात मोठं धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरात तुळशीचं रोप असतंच. पण कोणत्या जागी तुळशीचं रोप असायला हवं आणि कोणत्या जागी नाही? याबद्दल फार कोणाला माहिती नसतं. तर जाणून घ्या कोणत्या जागी तुळशीचं रोप लावू नये...

घरात या 7 ठिकाणी चुकनही तुळस लावू नका, अनेक समस्यांना घेरलं जाईल घर
| Updated on: Oct 04, 2026 | 3:21 PM

हिंदू धर्मात तुळस फक्त रोप नाही तर, त्याला फार मोठं धर्मिक महत्त्व आहे, अनेक पूजा विधींमध्ये तुळशीचा वापर केला जातो… तुळाशीला प्रचंड पवित्र देखील मानलं जातं. सांगायचं झालं तर, धार्मिक मान्यतेनुसार, तुळस हे देवी लक्ष्मीचं एक रूप असून ती भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. याच कारणामुळे, अनेक घरांमध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते आणि संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावला जातो. पण घरात कोणत्या जागी तुळशीचं रोप लावायला हवं याबद्दल अनेकांना मोठा प्रश्न पडलेला असतो. तर अशा सात जागा माहिती करून घ्या जेथे तुळशीचं रोप कधीट ठवू नका… तर जाणून घ्या कोणत्या आहे त्या जागा…

वास्तूशास्त्रात सांगितल्यानुसार, दक्षिण दिशेला तुळस ठेवू नका. वास्तूनुसार, दक्षिण दिशेला तुळशीची रोपं ठेवणं टाळावं. धार्मिक मान्यतेनुसार, दक्षिण दिशा यमदेवाशी संबंधित आहे; त्यामुळे ही दिशा तुळशीसाठी योग्य मानली जात नाही. वास्तूच्या तत्त्वांनुसार, उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशा तुळशीच्या रोपांसाठी शुभ मानल्या जातात.

Loading...

बेडरूममध्ये तुळशीचे रोप ठेवू नका. असेल तर लगेच दुसऱ्या ठिकाणी ठेवा, तुळस ही एक पवित्र आणि पूजनीय वनस्पती मानली जाते; त्यामुळे, ती बेडरूममध्ये ठेवणं योग्य नाही. धार्मिक परंपरेनुसार, तुळशीसाठी स्वच्छ आणि शांत जागेची निवड केली पाहिजे.

बाथरूम किंवा शौचालयाजवळ देखील तुळस ठेवू नका: तुळशीचे रोप बाथरूम किंवा शौचालयाजवळ ठेवू नये. धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशीसारख्या पवित्र वनस्पतीसाठी ही ठिकाणे अयोग्य मानली जातात. ते नेहमी अशा ठिकाणी ठेवले पाहिजे जिथे पूर्ण स्वच्छता राखता येईल.

तुळस अंधाऱ्या जागी ठेवू नका. तुळशीची रोपं अपुरा प्रकाश किंवा हवा असलेल्या ठिकाणी ठेवू नयेत. बंद खोलीत किंवा घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवल्याने रोपाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, रोपाला पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि हवा मिळेल अशी जागा निवडणे सर्वोत्तम मानलं जातं.

वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील तुळशीचे रोप स्टोव्हजवळ ठेवू नये. जास्त उष्णता आणि धुरामुळे रोपाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे, स्वयंपाकघरात तुळस ठेवली असली तरी, ती स्टोव्हपासून पुरेशा अंतरावर ठेवावी. तुळस ही एक पवित्र वनस्पती मानली जाते. त्यामुळे, ती कचरा, अस्वच्छ जागा किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. धार्मिक परंपरांनुसार तुळशीच्या रोपाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यावर आणि तिची नियमितपणे काळजी घेण्यावर भर दिला जातो.

घरातील जिन्याखाली तुळशीचे रोप ठेवणे टाळावे. अशा ठिकाणी अनेकदा पुरेसा प्रकाश आणि हवा मिळत नाही. तसेच, सततच्या वर्दळीमुळे रोपाची योग्य काळजी घेणे अवघड होते. म्हणून, तुळशीसाठी अशी जागा निवडणे उचित आहे, जिथे ते मोकळ्या जागेत ठेवता येईल आणि त्याची नियमितपणे काळजी घेता येईल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us