New Year 2023: वर्षाच्या पहिल्या दिवशी ‘या’ मंदिरांमध्ये करा दर्शन, वर्षभर कायम राहील सुख-समृद्धी

| Updated on: Dec 07, 2022 | 3:45 PM

नवीन वर्षाची सुरवात अनेक जण मंदिरात दर्शन घेऊन करतात. तुम्ही देखील 2023 ची सुरुवात काही विशिष्ट मंदिरात दर्शन घेऊन करू शकता.

New Year 2023: वर्षाच्या पहिल्या दिवशी या मंदिरांमध्ये करा दर्शन, वर्षभर कायम राहील सुख-समृद्धी
महाकाल मंदिर
Follow us on

मुंबई, प्रत्येक नवीन वर्ष (New Year 2023) एक नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. येणारे वर्ष 2023 त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक जण  वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात (Temple) जाऊन प्रार्थना करतात. शास्त्रानुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देवाच्या दर्शनाने केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते. जीवनात संपत्ती आणि प्रगतीसोबतच आनंद मिळतो. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्यासारखा असतो. अशा परिस्थितीत नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्हीही भारतातील या खास मंदिरांना भेट देऊ शकता. असं म्हणतात की इथे येणाऱ्यांच्या इच्छा कायमच पूर्ण होतात.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

सिद्धी विनायक मंदिर, मुंबई

 

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर जगप्रसिद्ध आहे. येथेएरवीदेखील भाविकांची वर्दळ असते, मात्र वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. बाप्पाच्या दारात येणारे कधीही रिकाम्या हाताने जात नाहीत, असा अनेकांचा अनुभव आहे. सिद्धिविनायक हे गणपतीचे सर्वात लोकप्रिय रूप मानले जाते. सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतल्याने संकट दूर होते अशी मान्यता आहे.

हे सुद्धा वाचा

महाकाल मंदिर उज्जैन

मध्य प्रदेशातील उज्जैन शहर हे महाकाल शहर म्हणून ओळखले जाते. देवाधिदेव महादेव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे, ज्याला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येथे महाकालच्या दर्शनासाठी येतात. येथे दररोज होणारी भस्म आरती आकर्षणाचे केंद्र आहे. बाबा महाकालच्या दर्शनाने सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

बांके बिहारी मंदिर

बांके बिहारी मंदिर, मथुरा

श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत ठाकूर श्री बांके बिहारी यांचे मंदिर आहे. नवीन वर्ष सुख-समृद्धीने  भरभरून जावो या इच्छेने भक्त कृष्णाच्या रुपात श्री बांके बिहारीजींचे दर्शन घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येने  जमतात. बांके बिहारीच्या पवित्र भूमीत येणारा प्रत्येक व्यक्ती पापमुक्त होतो, असे म्हणतात. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर गूढतेने भरलेले आहे. असे मानले जाते की, बांके बिहारीजींच्या मूर्तीमध्ये इतके आकर्षण आहे की त्यांना पाहताच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन भक्त आपली भान हरवून बसतो.

सालासार बालाजी मंदिर

सालासर बालाजी हनुमान मंदिर, राजस्थान

सालासर बालाजी मंदिर हे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सालासर गावातील हजारो लोकांचे श्रद्धास्थान आहे. येथे हनुमानजींची दाढी-मिशी असलेली मूर्ती आहे. बालाजी मंदिरात येणाऱ्या भाविकांची प्रत्येक समस्या दूर होते. संकटमोचन हनुमान आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)