AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : हवामानात मोठा बदल, अवकाळीचे संकट टळले, पुढील 24 तासात…

मागच्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. आता अवकाळीचे संकट टळले असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

IMD Weather Update : हवामानात मोठा बदल, अवकाळीचे संकट टळले, पुढील 24 तासात...
IMD Weather Update
| Updated on: Feb 28, 2026 | 7:17 AM
Share

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस कधी उकाडा अशी स्थिती आहे. मागच्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस राज्यात धुमाकूळ घालताना दिसला. सतत पाऊस सुरू होता. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आता राज्यावरील अवकाळीचे संकट दूर झाले असून उन्हाचा कडाका वाढला. आजही तापमानात सतत चढउतार बघायला मिळेल. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. फेब्रुवारी महिन्यात थंडी जवळपास गायब झाली. डिसेंबर महिन्यात फक्त म्हणावी तशी थंडी अनेक भागात झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी होती, पारा खाली जात होता. मात्र, म्हणाव्या तश्या शीतलहरी राज्यात दाखल होत नव्हत्या. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यात मोठा पाऊस झाला. या पावसानंतर राज्यातील थंडी गायब झाली. फेब्रुवारी महिन्यात राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसला. थंडी, पाऊस आणि उकाडा असे तिन्ही हंगाम अनुभवता आली.

राज्यात उकाडा वाढू लागला आहे.दुपारच्या पारी घराबाहेर पडणेही कठीण झालंय. उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. पंजाबच्या भटिंडा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. भटिंडा येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 12.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 36.3 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

शहरासह पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घटत असलेल्या किमान तापमानात शुक्रवारी दोन ते तीन अंशाने वाढ झाली. परिणामी पहाटेचा गारवा कमी झाला असून दिवसभरात कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. लोहगाव येथे सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

जिल्ह्यातील शिरूर, कुरवंडे यासह एनडीए आणि हवेली परिसरात गेल्या 24 तासांत किमान तापमान 8 अंशापर्यंत खाली आल्यामुळे पहाटेचा गारवा वाढला होता. मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि गारवा असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे. दोन दिवसांपासून पहाटे जाणवणारी थंडी गायब झाली आहे. किमान तापमान 11 ते 12अंशाच्या पुढे नोंदविले गेले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...