Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..!

| Updated on: Jul 10, 2022 | 1:18 PM

राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी त्याच बरोबरीने नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाबाबत कटीबध्द असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले आहे.

Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

पंढरपूर :  (Aashadhi Wari) आषाढी वारीसाठी सबंध राज्यभरातून 10 लाखाहून अधिक भाविक हे (Pandharpur) पंढरपुरात दाखल होत असतात. शिवाय वारकऱ्यांची जबाबदारी ही (Administration) प्रशासनावर असते. आषाढी वारीच्या अनुशंगाने नियोजन करण्यासाठी प्रशसानाला 3 कोटीचा निधी दिला जातो पण वाढती संख्या आणि मूलभूत सोई सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून आता आगामी वर्षापासून राज्य सरकार हे 5 कोटीच्या निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातच केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अधिक सोई-सुविधा पुरविता येणार आहे.

जनेतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध

राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी त्याच बरोबरीने नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाबाबत कटीबध्द असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले आहे. जनतेच्या अपेक्षा वाढणे हे साहजिक आहे पण केंद्राची मदत आणि राज्याचा जेडीपी यामुळे हे शक्य असल्याचेही ते म्हणाले आहेत. शिवाय मुख्यमंत्री पदावर असलो तरी महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याचेही शिंदे म्हणाले आहेत.

शासन आणि प्रशासन हेच मुख्य घटक

शासन आणि प्रशासन हे रथाची दोन चाके आहेत. सरकारच्या माध्यमातून योजना राबवल्या जात असल्या तरी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम हे प्रशासकिय अधिकारी करीत असतात. त्यामुळे हा घटक देखील महत्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या नियोजनाचे कौतुक केले आहे. सबंध वारीतील नियोजन योग्यरित्या झाले आहे. शिवाय वारकऱ्यांच्या सोई-सुविधांसाठी कुठेही कमतरता राहणार नाही. त्यामुळेचे शासकीय निधीमध्ये वाढ केली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

पंढरपूर गोर गरिबांचे दैवत

पंढरपूर हे एक असे तीर्थक्षेत्र आहे जिथे कितीही वारकरी आले तरी समावून घेण्याची क्षमता आहे. गेल्या 15 दिवसांपासून पंढरपूरकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर वारकऱ्यांची गर्दी होती. विठ्ठल आणि वारकरी याचे नाते हे वेगळे असून ते अधिक दृढ करणे ही प्रशसनाचा जबाबदारी आहे. त्यामुळे सोई-सुविधांमध्ये कुठेही कमी होता कामा नये अशा सूचनाही शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.