आता ‘भक्ती’ही झाली ‘हाय-टेक’, ‘माघ मेला’मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर

| Updated on: Feb 09, 2021 | 3:16 PM

आता 'भक्ती'ही झाली 'हाय-टेक', 'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर(Now devotion has also become high-tech)

आता भक्तीही झाली हाय-टेक, माघ मेलामध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर
'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर
Follow us on

उत्तर प्रदेश : सध्याचे युग हे टेक्नेलॉजीचे युग आहे. लाखो-करोडो लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. हल्ली बिझनेस, शॉपिंग प्रत्येक गोष्टीला डिजिटल स्वरुप मिळाले आहे. मग साधू, संत मागे कसे राहतील. आता या डिजिटल जगात ‘भक्ती’नेही प्रवेश केला आहे. संत लोक आता भक्तांपर्यंत पोहचण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर करीत आहेत. देशात ‘माघ मेला’ खूप प्रचलित आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे भक्त या मेलामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही टेक्नेलॉजी वरदान ठरत आहे.(Now devotion has also become high-tech)

आता प्रवचन लाईव्ह स्ट्रिमिंगवर

मेलामध्ये होणाऱ्या प्रवचनाचे लाईव्ह स्ट्रिमिंग संत सोशल मीडियावर करीत आहेत. संत लोक आपल्या फेसबुक पेज आणि यु-ट्यूब चॅनेलवर नियमित भागवत कथा आणि राम कथा अपलोड करीत आहेत. अखिल भारतीय दंडी संन्यासी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी ब्रह्माश्रम महाराज म्हणाले की, ते नियमित आपल्या अनुयायांशी स्काईप आणि फेसटाइमच्या माध्यमातून निर्धारीत वेळेत बातचीत करतात. माझ्या भक्तांचे असंख्य प्रश्न आहेत आणि ते प्रश्नांचे मी तांत्रिक माध्यमातून निराकरण करतो. माघ मेलामध्ये जवळपास प्रत्येक शिबिरात एक लॅपटॉप आणि एक टेक-सेवी शिष्य आहे. व्हाट्सअॅप (What’s App) च्या माध्यमातून पत्रकार परिषदेबाबत माहिती देण्यात येते. तसेच प्रवचन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमाची माहिती ई-मेल आणि सोशल मीडिया (Social Media) च्या माध्यमातून देण्यात येत असल्याचेही स्वामी ब्रह्माश्रम महाराज म्हणाले. काळानुसार परिस्थिती बदलत आहे. या बदलामुळे आयुष्यात बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. उच्च शिक्षित संतांचे प्रमाणही आता वाढले आहे. संत उच्च शिक्षित असल्याने टेक्नोलॉजीचा वापर करणे सोपे जातेय, असेही त्यांनी नमूद केले.(Now devotion has also become high-tech)

 

 

इतर बातम्या

Whatsapp चॅट करताना YouTube व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी

6000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह Infinix चा दमदार फोन लाँच होतोय, किंमत खूपच कमी