6000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह Infinix चा दमदार फोन लाँच होतोय, किंमत खूपच कमी

इन्फिनिक्स (Infinix) कंपनी त्यांचं नवीन डिव्हाईस स्मार्ट 5 (Infinix Smart 5) हा स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे.

6000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरासह Infinix चा दमदार फोन लाँच होतोय, किंमत खूपच कमी

मुंबई : इन्फिनिक्स (Infinix) कंपनी त्यांचं नवीन डिव्हाईस स्मार्ट 5 (Infinix Smart 5) हा स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे. हा फोन Infinix Smart 4 चं पुढचं वर्जन असणार आहे. हा फोन गेल्या वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. Infinix Smart 5 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेट्अप देण्यात आला आहे. सोबत 6.82 इंचांचा डिस्प्ले आणि सेल्फी कॅमेरासाठी नॉच देण्यात आला आहे. दरम्यान, या Infinix Smart 5 या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर आधीच एक पेज तयार करण्यात आलं आहे. (Infinix Smart 5 India Launch Date Set for February 11, to Feature Dual Rear Cameras and 6.82-Inch Display)

दरम्यान, कंपनीने अद्याप या फोनच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. ऑगस्ट 2020 मध्ये Infinix Smart 4 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या फोनचं 3G वेरिएंट सादर करण्यात आलं होतं. त्यावेळी हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला होता. या फोनची किंमत 7800 रुपये होती. आता कंपनी Infinix Smart 5 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनची किंमतही 9 हजार रुपयांपेक्षा कमी असेल असं अंदाज व्यक्त केला जात आहे.

फोनमधील फीचर्स

फोनमध्ये 6.82 इंचांचा HD+ डिस्प्ले दिला जाईल, जो नॉच सेल्फी कॅमेरासह येतो. या फोनचं भारतीय वेरिएंट थोडं वेगळं असू शकतं. या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. या फोनच्या ग्लोबल वेरिएंटबाबत बोलायचे झाल्यास हा फोन अँड्रॉयड 10 गो एडिशनवर बेस्ड असेल, जो XOS 6 सह येतो.

या फोनच्या ग्लोबल वेरिएंटमध्ये युजर्सना 6.6 इंचांचा 720×1,600 पिक्सल्सचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz चा प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 3 जीबी रॅमसह येतो. या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास या फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर दोन QVGA सेंसर्सही देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

इन्फिनिक्स स्मार्ट 5 हा स्मार्टफोन 64 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवू शकता. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय, 4 जी, जीपीएस, ब्लुटूथ, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Infinix या फोन्सना ग्राहकांची पसंती

Infinix Smart 4: किंमत 6,999 रुपये : इनफिनिक्स स्मार्ट 4 हा मोबाईल सध्या चांगला ट्रेंडमध्ये आहे. या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन फक्त 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

इन्फिनिक्स स्मार्ट HD (Infinix Smart HD 2021) : इन्फिनिक्स स्मार्ट HD हा स्मार्टफोन भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन युजर्स फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकतात. इन्फिनिक्स स्मार्ट HD मध्ये 6.1 इंचांचा HD+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर असे सांगण्यात आले आहे की, या फोनला मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये 1.2GHz चा चिपसेट दिला जात आहे. जो 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबतच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही (सेल्फी कॅमेरा) मिळेल.

हेही वाचा

Samsung Galaxy F62 भारतात लाँच होण्यास सज्ज, किंमत फक्त…

2021 च्या पहिल्या तिमाहीत Samsung चा धडाका, Galaxy A52, Galaxy A72 आणि Galaxy F12 सह 5 ढासू स्मार्टफोन लाँच होणार

6000mAh बॅटरी, 48MP क्वाड कॅमेरासह Samsung चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Infinix Smart 5 India Launch Date Set for February 11, to Feature Dual Rear Cameras and 6.82-Inch Display)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI