या तारखेला जन्मलेल्या मुलींना नात्यामध्ये मिळतो धोका, पण नेहमी इतरांच्या मदतीला जातात धावून

या तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूपच भावनिक, कोणाच्याही मदतीला लगेच येतात धावून. पण त्याच होतात फसवणुकीच्या शिकार.

| Updated on: Feb 12, 2026 | 5:30 PM
1 / 7
अंकशास्त्राला भारतीय ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते. जन्मतारीखेनुसार काढला जाणारा मूलांक व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि आयुष्याचा कल समजून घेण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

अंकशास्त्राला भारतीय ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते. जन्मतारीखेनुसार काढला जाणारा मूलांक व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि आयुष्याचा कल समजून घेण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

2 / 7

जन्मतारखेतील दिनांक एक अंकी संख्येत रूपांतरित करून मूलांक निश्चित केला जातो. आज आपण मूलांक 02 असलेल्या मुलींच्या स्वभावाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11 किंवा 20 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 02 मानला जातो.

3 / 7

या मूलांकाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मातृत्वाचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे या मुलींवर चंद्राचा विशेष प्रभाव दिसून येतो. या मुली अत्यंत क्रिएटिव्ह, संवेदनशील आणि भावनिक स्वभावाच्या असतात. मात्र, त्या अनेकदा नात्यांमध्ये फसवणूकही सहन करतात.

4 / 7

मूलांक 02 असलेल्या मुली अत्यंत भावनिक असतात. त्यांना इतरांचे दु:ख पाहवत नाही. कुणी मदतीसाठी हाक मारली की त्या तत्परतेने पुढे येतात. त्या डोक्यापेक्षा मनाने निर्णय घेतात.

5 / 7

यामुळेच त्या इतरांच्या भावना पटकन ओळखू शकतात. त्यांचा स्वभाव शांत आणि सौम्य असतो. नातेसंबंधांबाबत त्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून वागतात. मात्र, त्यांची हीच भावनिकता अनेकदा त्यांची कमजोरी ठरते. त्या पटकन कोणावरही विश्वास ठेवतात.

6 / 7

अतिशय भावनिक असल्यामुळे नात्यांमध्ये त्या जास्त गुंतून जातात आणि त्यामुळे फसवणूक झाल्यास त्यांना मोठा मानसिक धक्का बसतो. काही वेळा लोक त्यांना 'इमोशनल फूल' असेही संबोधतात.

7 / 7

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठी याची खातरजमा करत नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us