Numerology : वयाच्या तिशीनंतर बघायचं कामच नाही, हे लोक झटपट होतात धनवान ; तुमचा मूलांक हाच आहे का?

Numerology : अंकज्योतिषानुसार हा मूलांक असलेल्या व्यक्तींना वयाच्या तिशीपर्यंत प्रचंड मेहनत करावी लागते. पण 30 वर्ष उलटून गेल्यावर त्यांचं नशीब अचानक चमकतं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होते. कोणता आहे तो मूलांक ?

Numerology : वयाच्या तिशीनंतर बघायचं कामच नाही, हे लोक झटपट होतात धनवान ; तुमचा मूलांक हाच आहे का?
तुमचा मूलांक कोणता ?
Image Credit source: freepik
| Updated on: Dec 19, 2025 | 3:31 PM

Numerology : ज्या तारखेला तुमचा जन्म होतो, त्याच तारखेची बेरीज करून जो अंक समोर येतो, त्याला म्हणतात मूलांक . उदाहरणार्थ जर तुमचा जन्म 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक असेल 1. पण जर तुमचा जन्म 8, 17, 26 अशा तारखांना झाला असेल तर तुमचा मूलांक ठरेल 8 . प्रत्येक मूलांकाची काही वैशिष्ट्य असतात. आज आपण 8 मूलांक असलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. असे म्हटले जाते की 8 हा मूलांक ज्यांचा असतो, त्या लोकांना साधारणपणे वयाच्या 30 वर्षांनंतरच यश मिळते.

शनि त्यांना यशस्वी करण्यापूर्वी त्यांची कसून परीक्षा घेतो. जेव्हा ते त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांची सर्व स्वप्नं सत्यात उतरू लागतात. 8 हा मूलांक सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली संख्यांपैकी एक मानला जातो. 8, 17 किंवा 26 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 मानला जातो. या मूलांक क्रमांकाच्या लोकांबद्दल काही मनोरंजक तथ्यं जाणून घेऊया.

8 मूलांक असलेल्यांची वैशिष्ट्यं

  • ज्यांचा मूलांक 8 आहे त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागतो आणि अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते, पण ते कधीही हार मानत नाहीत.
  • अंकशास्त्रानुसार, 30 ते 35 वर्ष या दरम्यान 8 मूलांकाच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होतो आणि या काळात ते खूप प्रगती करू लागतात.
  • वयाच्या 30 व्या वर्षानंतर, त्यांच्या आयुष्यात पैसे कमविण्याचे नवीन मार्ग सापडतात आणि शनीच्या आशीर्वादाने त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात.
    समाजात त्यांना खूप आदर मिळतो.
  • कठोर परिश्रम, शिस्त आणि संयम हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हे गुण अखेर त्यांना श्रीमंतीकडे घेऊन जातात.
  • त्यांच्यातील एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कठीण परिस्थितीतही धीर सोडत नाही, संयमानेच वागतात.
  • ते जोखीम घेण्यास कधीही घाबरत नाहीत. ते त्यांच्या आर्थिक बाबी आणि करिअरबद्दल खूप गंभीर असतात.
  • 8 मूलांक असलेली लोकं अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करत नाहीत.
  • या लोकांना व्यवसाय, राजकारण, प्रशासन, रिअल इस्टेट आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात मोठे यश मिळतं.
  • तसं पहायला गेलं तर 8 मूलांक असलेली लोकं शांत स्वभावाचे असतात, पण गरज पडल्यास ते सर्वात कठीण, कठोर निर्णय घेण्यासही मागेपुढे पहात नाहीत.
    या लोकांमध्ये नेतृत्व गुण चांगले असतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)