या 3 राशींचे लोक धूर्त, नेहमी राहा सतर्क, नाहीतर फेऱ्यात आलेच म्हणून समजा

Zodiac Signs : वैदिक ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचे गुण आणि अवगुणाची चर्चा केली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशी या जन्मतःच हुशार आणि धूर्त असतात. कोणत्या आहेत या त्या तीन राशी?

या 3 राशींचे लोक धूर्त, नेहमी राहा सतर्क, नाहीतर फेऱ्यात आलेच म्हणून समजा
या राशी हुशार
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 24, 2025 | 5:14 PM

ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगण्यात आले आहे. विस्ताराने त्यां राशीचे गुण, अवगुण याची माहिती देण्यात आली आहे. राशिचक्रातील प्रत्येक राशीचा ग्रह, गुरू आणि देवता निश्चित असते. या राशीवर ग्रह वा नक्षत्राचे स्वामित्व असते. स्वामी ग्रह आणि नक्षत्राच्या प्रभावामुळे या राशीच्या व्यक्तीकडे काही खास स्वभाव लक्षण दिसून येते. ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशी या जन्मतःच हुशार आणि धूर्त असतात. कोणत्या आहेत या त्या तीन राशी?

या 12 राशीमध्ये तीन राशी अशा निष्णात आणि हुशार आहेत की, त्यामुळे इतर राशींवर मोठा प्रभाव दिसून येतो. या राशी बोलघेवड्या असतात. त्यांना काम कसं करून घ्यावं, याची खास कला असते. या राशींच्या व्यक्तीचा इतरांवर प्रभाव असतो. त्यांची निर्णय क्षमता चांगली असते. ते मदतीला पण धावून येतात. पण तितकेच ते धूर्त पण असतात.

मेष रास

मेष राशीच्या व्यक्ती जन्मापासूनच हुशार असतात. या राशीच्या लोकांचे प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष असते. ते सक्रिय असतात. ते तैलबुद्धीचे असतात. मेष राशीच्या व्यक्ती नेहमी सकारात्मक असतात. वाईट परिस्थितीतही ते संधी साधतात. त्यांची निर्णय क्षमता जबरदस्त असते.

मिथुन रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीचे लोक सुद्धा जन्मत:च हुशार आणि धूर्त असतात. या राशीच्या लोकांना लिहिणे आणि वाचण्याचा छंद असतो. त्यांचा हजरजबाबीपणा लाजबाब असतो. मिथुन राशीचे लोक कोणतेही काम अत्यंत हुशारीने आणि मन लावून करतात. या राशीचे लोक राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतात. त्यांच्यात नेतृत्व गुण असतो.

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक निष्णात आणि बुद्धीमान असतात. या राशीचे लोक नेहमी काही तरी नवीन शिकण्याच्या तयारीत असतात. त्यांना नवीन शिकण्याची हौस आणि छंद असतो. या राशीचा स्वभाव जिद्दी असतो. कुंभ राशीचे लोक मनाने निर्मळ असतात. हे नवीन लोकांशी सहज मैत्री करतात. त्यांच्याशी आत्मविश्वासाने बोलतात. या राशीचे लोक निडर आणि बेधडक असतात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. टीव्ही ९ मराठी याची पुष्टी करत नाही..)